शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचपदासाठी सर्वच सदस्यांचे गुघड्याला बाशिंग

By admin | Updated: August 26, 2015 21:22 IST

नऊच्या नऊ इच्छुक : तिढा काही सुटता सुटेना; सरपंचपद रिक्त

मलकापूर : नांदलापुरात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या आरक्षित उमेदवाराचा पराभव झाल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच गावाचा कारभारी ठरणार असल्यामुळे सर्व नऊच्या-नऊ सदस्य कारभाऱ्याच्या शर्यतीत उतरले आहेत. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.नांदलापूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच निवडणूक झाली. मात्र, वॉर्ड आरक्षण सोडतीत कोणत्याच वॉर्डमध्ये अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण पडले नाही; मात्र सरपंचपद अनुसूचित जाती-जामातीसाठी आरक्षित आहे. त्यानुसार वॉर्ड क्रमांक १ मध्ये ओपन जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवारास दोन्ही गटांनी उमेदवारी दिली होती. मात्र मंदा शिर्के, शशिकला शिर्के व रमेश शिर्के हे निवडून आले. नांदलाईदेवी वॉर्ड क्रमांक दोन मधून ओ. बी. सी. पुरुष गटातून योगेश शिर्के, माधुरी चव्हाण ओपन महिला, जालिंदर डिसले तर हनुमान वॉर्ड क्रमांक ३ मधून जयसिंग लावंड ओपन पुरुष, योगिता कचरे ओपन महिला, ज्योती वास्के ओ. बी. सी. महिला हे निवडून आले. मात्र प्रभाग १ मध्ये सरपंचपदासाठी उभे केलेले अनुसूचित जातीचे उमेदवार पडल्याने कोणत्याही गटाला सरपंचपदाचा सदस्य नाही. त्यामुळे येथील सरपंचपद रिक्तच राहणार, हे सिद्ध झाले आहे. गुरुवारी गाव कारभारी म्हणून उपसरपंचपदाची निवड होणार आहे. या निवडीसाठी गेल्या पंधरा दिवसांत मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र आजतागायत उपसरपंचपदाचा कारभारी निश्चित झालेला नाही. निवडून आलेले सर्वच्या सर्व नऊ उमेदवार गावकारभाऱ्याच्या शर्यतीत असल्याचीच चर्चा गावात सुरू आहे. जर नऊच्या नऊ सदस्य उपसरपंच पदासाठी इच्छुक असतील व त्यांनी सर्वांनी त्या पदासाठी अर्ज भरले तर कोण कोणाला निवडून देणार, हा प्रश्न गंभीर झाला असून, स्वत:चे मत दुसऱ्याला कसे देणार, असा तिढा निर्माण झाला आहे. तो तिढा सोडविण्यात कोणत्याही गटाला किंवा उमेदवाराला यश आलेले नाही. (प्रतिनिधी) आरक्षण बदलण्याची मागणी गावात निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीचा एकही सदस्य नाही. फेरनिवडणुकीचा खर्च व प्रक्रिया विचारात घेता सरपंचपदाचे आरक्षणच बदलून द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असे जयसिंग लावंड यांच्यासह सर्व सदस्यांनी सांगितले.