शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शंकर मंदिरात बाईच्या बुवाबाजीचा पर्दाफाश

By admin | Updated: July 15, 2014 01:26 IST

जादूटोणाविरोधी कायदा : जिल्ह्यात पहिली कारवाई

कऱ्हाड/मलकापूर : ओंड, ता़ कऱ्हाड येथील शंकराच्या मंदिरात होत असलेल्या बुवाबाजीचा ‘अंनिस’कडून सोमवारी पर्दाफाश करण्यात आला़ जादूटोणाविरोधी नवीन कायद्यानुसार ही जिल्ह्यातील पहिली कारवाई आहे़ रंजना संजय पवार (वय ३८, मूळ रा़ ओंड सध्या राहणार संत तुकाराम हायस्कूल जवळ, शुक्रवार पेठ कऱ्हाड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे़ याबाबत पोलीस व अंनिस कडून मिळालेल्या माहितीनुसार, रंजना पवार ही महिला ‘इयत्ता तिसरीत असताना एक रुपयाच्या कागदावर शंकराचा दृष्टांत झाला,’ असे सांगून, ‘शंकर माझ्याशी थेट संपर्क करतो,’ असा प्रचार करत होती. सहा वर्षांपासून पाटील मळा आेंड, ता़ कऱ्हाड येथील शंकराच्या मंदिरात दर सोमवारी तिचा दरबार भरत असे़ जादूटोण्याच्या नावाखाली आर्थिक, मानसिक फसवणूक करत होती़ या भागातील एका कुटुंबाला विश्वासात घेऊन मुलीचा नवरा डॉक्टर आहे़ त्याच्या दवाखान्यात तृतीयपंथीने डॉक्टरला शाप दिला आहे, त्यामुळे तुमच्या मुलीला मूल होत नाही, अशी बतावणी सांगून सुशिक्षित कुटुंबात विष कालवण्याचे प्रयत्न केला़ धाडसाने त्यामुलीने अंनिसशी संपर्क करून पंधरा दिवसांपासून या बुवाबाजीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आज (सोमवारी) सकाळी ८ वाजता अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष समितीचे सचिव भगवान रणदिवे, सीताराम चाळके, किशोर ननावरे, संध्या जाधव, छकुताई देटे यांनी पोलिसांसह तिला रंगेहाथ पकडले़ या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश गर्जेंसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)