शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वीज न जोडल्याच्या रागातून सहायक अभियंत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:30 IST

mahavitaran Crimenews Satara : हॉटेलचे वीज बिल न भरल्यामुळे वीज जोडणी तोडली होती. त्यानंतर वीज बिलाची थकित रकमेपैकी निम्म्यापेक्षा जास्त रक्कम भरूनही वीज कनेक्शन न जोडल्याचा राग मनात धरून मसूर येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता हृषिकेश भीमराव नलवडे यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवीज न जोडल्याच्या रागातून सहायक अभियंत्याला मारहाणशिवीगाळ, दमदाटीही : खराडेतील हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल

मसूर : हॉटेलचे वीज बिल न भरल्यामुळे वीज जोडणी तोडली होती. त्यानंतर वीज बिलाची थकित रकमेपैकी निम्म्यापेक्षा जास्त रक्कम भरूनही वीज कनेक्शन न जोडल्याचा राग मनात धरून मसूर येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता हृषिकेश भीमराव नलवडे यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.दमदाटी शिवीगाळ करत मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रकाश बाजीराव जाधव (रा. खराडे ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी प्रकाश बाजीराव जाधव यांचे मसूर हद्दीत कांबिरवाडी फाटा ते कोरेगाव जाणारे रोडवर साई पार्क नावाचे हॉटेल आहे.

शोभा जगदाळे यांचे नावाने वीज जोडणी आहे. संबंधित वीज जोडणी मार्च २०२१ मध्ये थकबाकी सुमारे ५२ हजार ८१० रुपये न भरल्यामुळे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते. बुधवार, दि. ३० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मसूर येथील वीज वितरण कार्यालयातील दालनात सहायक अभियंता हृषिकेश नलवडे काम करत होते.त्या ठिकाणी बाजीराव जाधव हे आले. त्यांनी सहायक अभियंता नलावडे यांना आत्तापर्यंत मी थकित वीज बिलाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये भरले आहेत. माझे वीज कनेक्शन जोडून द्या असे सांगितले. त्यावर अभियंता नलवडे यांनी त्यांना ह्यतुम्ही पूर्ण वीज बिल भरल्याशिवाय वीज जोडणी जोडता येणार नाही,ह्ण असे सांगितले. त्यावेळी प्रकाश जाधव यांनी माझी वीज जोडणी कसे सुरू करत नाही, ते बघतो असे म्हणून नलवडे यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली.

यात नलावडे हे जखमी झाले. त्यावेळी नलावडे यांच्या बोटाला व कोपराला दुखापत झाली. त्या ठिकाणी प्लास्टिकची खुर्ची व डिजिटल मीटर फुुटल्याने नुकसान झाले. त्यावेळी त्या ठिकाणी भांडणाचा आवाज ऐकून आलेल्या लोकांनी जाधव यांना तेथून घालवून दिले. घटनेची फिर्याद सहायक अभियंता हृषिकेश नलवडे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारीKaradकराडSatara areaसातारा परिसर