रस्त्याच्या कारणावरून सशस्त्र मारामारी

By Admin | Updated: September 11, 2014 23:10 IST2014-09-11T22:00:50+5:302014-09-11T23:10:25+5:30

चोरमारवाडीतील घटना : चौघे गंभीर; १९ जणांवर गुन्हा दाखल

Armed fights due to road reasons | रस्त्याच्या कारणावरून सशस्त्र मारामारी

रस्त्याच्या कारणावरून सशस्त्र मारामारी

कऱ्हाड : चोरमारवाडी (ता. कऱ्हाड) येथे रस्ता करण्याच्या कारणावरून गुरूवारी सकाळी दोन गटांत सशस्त्र मारामारी झाली. त्यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सर्जेराव मारूती चोरमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्माराम तुकाराम चोरमारे, सुनील बाबासाहेब चोरमारे, दादासाहेब विठ्ठल चोरमारे, संदीप बाबासाहेब चोरमारे, हणमंत तुकाराम चोरमारे, बाबासाहेब विठ्ठल चोरमारे, दादासाहेब तुकाराम चोरमारे व मालन बाबासाहेब चोरमारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे, तर महादेव तुकाराम चोरमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाराम विठ्ठल चोरमारे, आनंदा मारूती चोरमारे, संजय केशव चोरमारे, बाजीराव मारूती चोरमारे, सर्जेराव मारूती चोरमारे, राहुल खाशाबा चोरमारे, अंकुश यशवंत चोरमारे, लव यशवंत चोरमारे, मनीषा यशवंत चोरमारे, रेखा बाजीराव चोरमारे, बाळासाहेब आकाराम चोरमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्जेराव चोरमारे यांच्या अंगणातून रस्ता करण्याच्या कारणावरून ही मारामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाकडी दांडके, दगड, गज, कोयता व हातोड्याने मारहाण केली. (प्रतिनिधी)

डोळ््यात मिरचीची पूड
या मारामारीवेळी एका गटाने मिरची पूड वापरल्याचे समोर आले आहे. डोळ्यांत मिरची पूड टाकून संशयितांनी एकमेकांना मारहाण केली. मारामारीत काही महिलाही जखमी झाल्या आहेत.

Web Title: Armed fights due to road reasons