शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतांकडे अपील; तहसीलदारांकडे याचना!

By admin | Updated: July 24, 2014 22:30 IST

-कहाणी एका बिल्डराची...अवैध उत्खनन : कारवाई टाळण्यासाठी कंग्राळकरांकडून जोरदार धावपळ

सातारा : राधिका रस्त्यावरील जागेत अनधिकृतरीत्या बेसुमार मुरुम उकरल्याप्रकरणी तहसीलदारांनी बिल्डर श्रीधर कंग्राळकर यांना २२ लाख ९५ हजार ७०० रुपये इतक्या दंडाची नोटीस धाडली आहे. या नोटिसीविरोधात कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले असून, प्रांतांच्या न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत कारवाई करू नये, अशी लेखी याचनाही कंग्राळकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.तहसीलदारांनी धाडलेल्या नोटिसीची मुदत बुधवारी (दि.२३) संपली आहे. या नोटिसीनुसार कारवाई अटळ असल्याने कंग्राळकर यांनी बुधवारीच तहसीलदारांच्या आदेशाविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. दरम्यान, राजपत्रित अधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्यभर आंदोलन पुकारले असल्याने प्रांताधिकारी व तहसीलदार हे दोन्ही अधिकारी आपल्या कार्यालयात नव्हते. त्यामुळे कोणतीच कारवाई गुरुवारी झाली नाही. दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे व ‘रिपाइं’ युथचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर गालफाडे यांनी या उत्खननाविरोधात आवाज उठविला आहे. मात्र, पैसे उकळण्यासाठी संबंधितांनी आपल्याविरोधात कार्यवाही केल्याचा आरोप कंग्राळकरांनी केल्याने बुधवारी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला होता. कंग्राळकरांनी माफी मागावी, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला होता. गुरुवारी उशिरापर्यंत माफीनामा कंग्राळकर यांच्याकडून सादर न झाल्याने सुशांत मोरे यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे मोरे यांनी सांगितले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)कंग्राळकर बिल्डरने राधिका रस्त्यावरील वादग्रस्त जागेत खोदकाम करण्यासाठी सुरुवातीला २७ नोव्हेंबर २०१३ रोजी ५०० ब्रासची व त्यानंतर २७ जानेवारी २०१४ रोजी ५०० ब्रासची परवानगी मागितली होती. प्रतिब्रास २०० रुपयांप्रमाणे या कामाचा महसूल भरला होता. प्रत्यक्षात मात्र त्यांनी तब्बल तीन हजार ८३ ब्रास मुरमाचे उत्खनन केल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. कंग्राळकर यांच्या एका प्रकल्पात हा प्रकार उघडकीस आला आहे. अनेकवेळा माझ्यावर दबाव आला; पण तो जुमानला नाही. कंग्राळकरांनी केलेल्या आरोपामुळे मी दुखावलो गेलो आहे. आरोप करणे सोपे असते. माझ्याविरोधात केलेल्या आरोपाबाबत त्यांनी पुरावा सादर करावा; अन्यथा न्यायालयीन लढ्याला तयार राहावे. अब्रूनुकसानीचा दावा भरण्याची तयारी मी सुरू केली आहे. - सुशांत मोरे, अध्यक्ष दिशा विकास मंच