अनुष्का कुंभारचे राज्यस्तरीय धावणे स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:17+5:302021-01-23T04:40:17+5:30

अंगापूर : सातारा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज अपशिंगे (मि.) येथील अकरावीमध्ये शिकणारी अनुष्का ...

Anushka Kumbhar's success in state level running competition | अनुष्का कुंभारचे राज्यस्तरीय धावणे स्पर्धेत यश

अनुष्का कुंभारचे राज्यस्तरीय धावणे स्पर्धेत यश

अंगापूर : सातारा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज अपशिंगे (मि.) येथील अकरावीमध्ये शिकणारी अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिने हे अंतर ४१.४६ सेकंदात पूर्ण केले. ३०० मीटर धावण्याचा राष्ट्रीय विक्रम ४० सेकंद एवढा असताना तिने यश मिळविले.

तिच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एम. डी. सदावर्ते व पर्यवेक्षक ए. आर. ढाणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी क्रीडा विभागप्रमुख एल. आर. पवार, एनसीसी प्रमुख अविनाश पवार व सर्व शिक्षक उपस्थित होते.

तसेच तिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सहसचिव संजय नागपुरे, विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी, सहायक विभागीय अधिकारी अब्बास मनेर, सुरेश गोडसे, स्कूल कमिटी सदस्य सुनील निकम तसेच सरपंच सारिका गायकवाड व सर्व ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले.

Web Title: Anushka Kumbhar's success in state level running competition