शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

लुटारू टोळीतील आणखी एक जाळ्यात

By admin | Updated: October 30, 2015 23:29 IST

शिरवळ पोलिसांचे यश : ट्रक चालकांना लुटण्याचे अनेक गुन्हे उघड होणे शक्य

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील आणखी एक आरोपीला अटक करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. किरण पांडुरंग डावारे ( वय १९, रा. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दरम्यान, खंडाळा न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि. २) पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी यापूर्वी पुणे येथील टोळीमधील एकाला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. १६ सप्टेंबरला झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील सुनील झेंडे हे रत्नागिरीहून फिनोलेक्स पावडरचा माल भरुन तळेगाव दाभाडे येथे मालट्रकमधून निघाले होते. यावेळी झेंडे हे शिरवळजवळील एका पेट्रोल पंपावर थांबले होते. पहाटे पाचच्या सुमारास झेंडे शौचविधीकरिता गेले असता अज्ञात तिघांनी झेंडे यांना चाकूचा धाक दाखवत खिशातील एक हजार रुपये, मालट्रकमधील नऊ हजार रुपये व मोबाईल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी यापूर्वी टोळीमधील संशयित दीपक सुरेश यादव (वय १९, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या दीपक यादव हा न्यायालयीन कोठडीत असून अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात आहे. या लूटमारीतील टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, शिरवळ पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कदम तपास करीत आहेत. महामार्गावरील ट्रकचालकांना लुटण्याच्या घटना जिल्ह्यात वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)