शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:48 IST

गोव्याहून दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वाढे फाट्यावर मंगळवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देगोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : गोव्याहून दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वाढे फाट्यावर मंगळवारी रात्री करण्यात आली.राहुल रमेश खलाटे (वय २७, रा. जयमल्हार सोसायटी खेड, सातारा) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गोवा राज्यातून एका कारमधून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला तत्काळ सापळा लावण्याच्या सूचना दिल्या.मंगळवारी रात्री एलसीबीच्या टीमने वाढेफाट्यावर सापळा लावला. त्यावेळी कऱ्हाड बाजूकडून आलेल्या कारला थांबविण्यात आले. या कारची पोलिसांनी झडती घेतली असता कारमध्ये विविध कंपनीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.

राहुल खलाटे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गोव्याहून आणलेली दारू अहमदनगर येथे विक्रीसाठी नेणार होतो, असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे साडेचार लाखांचा दारूचा साठा जप्त केला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, हवालदार सुधीर बनकर, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, विक्रम पिसाळ, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस