सातारा : येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्प हे सातारकरांसाठी दिवास्वप्न ठरले होते. कारण हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला होता. शासनाने दोन वेळा निविदा काढूनही ठेकेदार मिळत नव्हता. अखेर २००५ साली तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी निर्णायक भुमिका घेतली अन् सातारकरांचे स्वप्न साकार झाले.सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक अजित पवार यांनी साताऱ्यात घेतली. क्रीडा संकुलाचा प्रकल्प आता झाला नाही, तर कधीच होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. सर्व सातारकरांनी एकत्र येऊन त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यावेळी सर्वांत कमी रकमेची निविदा असल्याने मला संधी मिळाली. त्यावेळी पवार यांनी क्रीडा संकुल हे भावी पिढीच्या खेळाडूंसाठी पंढरीच असते, आपल्या साताऱ्याला चांगल्या खेळाडूंचा इतिहास आहे. हे काम अत्यंत दर्जेदार व वेळेत होणे आवश्यक आहे, असे माझ्याकडून वचन घेऊन त्यांनी भूमिपूजन केले.एवढ्यावर न थांबता संकुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तीन वर्षांत त्यांनी किमान १५ वेळा पाहणी केली. मार्गदर्शन आणि निधीची तरतूद केली. त्यामुळेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील वेळेत पूर्ण होणारा हा पहिला प्रकल्प अस्तित्त्वात आला, अशा आठवणींना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी उजाळा दिला.
...अशी स्मशानभूमी उभी राहू शकते ?कैलास स्मशानभूमी उभारण्याचे मॉडेल आम्ही अजित पवार यांना दाखविले. त्यावेळी त्यांनी आश्चर्य व्यक्त करत उद्गार काढले, “अशी सुसज्ज स्मशानभूमी उभी राहू शकते का?” उत्सुकतेने त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. दुसऱ्याच दिवशी सकाळी ७:०० वाजता त्यांनी स्वतः जुन्या स्मशानभूमीची पाहणी करण्याची इच्छा दर्शविली. ठरल्याप्रमाणे ते वेळेवर आले. त्यावेळी आम्हाला ते वेळेस किती कटिबद्ध आहेत, हे समजल्याचे चोरगे यांनी सांगितले.
संगमावरील घाट विकास प्रकल्पाला मान्यताआठ महिन्यांपूर्वी सर्किट हाऊस येथे कृष्णा–वेण्णा संगमावर असलेला घाट विकसित करण्याचा प्रकल्प छायाचित्रांसह आम्ही अजित पवार यांना दाखविला. हा प्रकल्प पाहून त्यांनी जागेवरच तात्त्विक मान्यता दिली. आता अचानक ते आपल्यातून निघून गेल्याने कृष्णा–वेण्णा संगम घाटावरील प्रकल्पाला त्यांची साथ शेवटपर्यंत लाभणार नाही, ही खंत चोरगे यांनी व्यक्त केली.
Web Summary : Ajit Pawar's decisive role ensured the completion of Satara's long-awaited sports complex. He personally oversaw progress, making 15 visits, securing funds, and ensuring quality work. Pawar also supported the Kailas crematorium and Krishna-Venna Sangam Ghat projects.
Web Summary : अजित पवार के निर्णायक हस्तक्षेप से सतारा का बहुप्रतीक्षित क्रीड़ा संकुल साकार हुआ। उन्होंने व्यक्तिगत रूप से प्रगति की निगरानी की, 15 बार दौरा किया, धन सुरक्षित किया और गुणवत्ता सुनिश्चित की। पवार ने कैलाश श्मशान और कृष्णा-वेन्ना संगम घाट परियोजनाओं का भी समर्थन किया।