शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर अशा दोन वाहनांवर ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर अशा दोन वाहनांवर २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा पाटील चौधरी यांनी दिली.

महाबळेश्वरमधील खेड्यापाड्यातील निसर्गरम्य ठिकाणातील काही भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. बांधकामास उठावदारपणा किंवा जुन्याकाळी बंगल्याचा रुबाब यावा, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लाल चिऱ्याच्या दगडामध्ये बांधकाम करण्याची फॅशन आली आहे. या दगडाची महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे दगड पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामधून महाबळेश्वरमध्ये येतात. दगड आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक व डंपरची वाहतूक आंबेनळी घाटातून सतत होत असते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वर येथील डंपर (एमएच ११ सीएच ६८६१) व ट्रक (एमएच ११ एएल ४८२५) या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दोन्ही वाहनांमध्ये दगडी चिराच असल्याचे स्पष्ट झाले.

ही कारवाई महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत. यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मंडलाधिकाऱ्यांनी दिला.

फोटो

०७महाबळेश्वर

महाबळेश्वरच्या महसूल विभागाने दगडांची वाहतूक करणारी दोन वाहने जप्त केली आहेत. (छाया : अजित जाधव)