शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुनवडी येथे बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुनवडी, (ता. सातारा) येथील शेतजमिनीत बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन करत नुकसान झाले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पुनवडी, (ता. सातारा) येथील शेतजमिनीत बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन करत नुकसान झाले असून, याप्रकरणी संतोष अनिल भोसले व त्यांचे बंधू राजू अनिल भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती पुनवडी येथील शेतकरी सुधीर किसन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुधीर देसाई म्हणाले, पुनवडी येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. काही जमिनी आम्ही खुश खरेदीने खरेदी केलेल्या आहेत. त्यामध्ये आमची पूर्वीपासूनच प्रत्यक्ष कब्जे वहिवाट असलेल्या क्षेत्रात गुरे चारत आहोत. त्याधील गवत गुरांसाठी चारा म्हणून आणत आहे, परंतु गेल्या आठवड्यामध्ये गुरे चारण्यासाठी गेलो असता

आमच्या कब्जे वहिवाटीत असणाऱ्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. दि. २८ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पुनवडी येथे स.न. ४६ मध्ये संतोष अनिल भोसले यांच्या नावे खाणपट्टा वा स्टोन क्रेशर आहे. तो मुळातच बेकायदेशीर असून त्याबाबत अनेकवेळा तक्रारी केलेल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून माझी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही भोसले बंधूंवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रात्रभर स्टोन क्रेशर चालवला जात असल्यामुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याचे पुरावे चौकशीच्या वेळी सादर करण्यात येतील. स्फोटासाठी सुरुंग लावण्यासाठी परवानगी घेण्यात येत नाही. पावसाळ्यामध्ये सर्व्हे नंबर ४५ मध्ये असणाऱ्या जमिनीत बंधारा आहे. तो क्रशरच्या पावडरने पूर्णपणे भरून ते पाणी उरमोडी धरणात जात असल्यामुळे धरणाचे पाणी दूषित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

कोट: पुनवडीत खाणपट्टा आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने देखील निर्णय दिला आहे. अशा प्रकारचा आरोप करणे हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. याप्रकरणी आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत.

-राजू भोसले