तीन ठिकाणी जुगार अड्डयावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST2021-06-03T04:28:03+5:302021-06-03T04:28:03+5:30

सातारा : गजवडी (ता. सातारा) येथे बस स्टॅन्डच्या पाठीमागील बाजूस जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ८४२ रुपये ...

Action on gambling dens in three places | तीन ठिकाणी जुगार अड्डयावर कारवाई

तीन ठिकाणी जुगार अड्डयावर कारवाई

सातारा : गजवडी (ता. सातारा) येथे बस स्टॅन्डच्या पाठीमागील बाजूस जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ८४२ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.

याप्रकरणी गणेश बाळू पाटोळे (वय ४०, रा. तासगाव, ता. सातारा, सध्या रा. गजवडी, ता. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला.

तसेच साईबाबा मंदिर, गोडोली येथील अजिंक्यतारा चारभिंतीलगत जाणाऱ्या रस्त्यालगत विजय हाईट्ससमोर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी २ हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य, एक मोबाईल जप्त केला. याप्रकरणी अजित संजय खंडागळे (वय २१, गुरुवार पेठ, गणपती मंदिरामागे, सातारा) तसेच मनी धनाजी भिसे (रा. बुधवारनाका, सातारा) या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.......

Web Title: Action on gambling dens in three places