शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा आकस्मिक

By admin | Updated: October 29, 2015 00:17 IST

मृत्यू कारण अस्पष्ट : शाळा प्रशासनावर नातेवाइकांचा आरोप

कोरेगाव : येथील छत्रपती शिवाजी केंद्रीय आश्रमशाळेतील विद्यार्थी अनिकेत भीमराव बनसोडे (वय १४, रा. पुसेगाव) याचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलीस ठाण्यात मात्र ‘आकस्मिक मृत्यू’ अशीच नोंद झाली आहे. अनिकेत बनसोडे हा आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. तेथे तो आजारी पडल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र उपचाराला शरीर साथ देत नसल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सातारा येथे खासगी आणि शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र आजाराचे व्यवस्थित निदान न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी प्राथमिक नोंद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाइकांची भेट घेतल्याने या घटनेस वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)आक्रोश आणि आरोपअनिकेतच्या निधनामुळे नातेवाइकांनी आक्रोश केला. तसेच माध्यमांशी बोलताना आश्रमशाळेवर हलगर्जीपणाचे आरोपही केले. तथापि, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाहीत. त्याला ‘सेप्टीसेमिया’ नावाचा आजार झाल्याचा संशय होता, असे डॉक्टरांनी सांगितले. या आजारात शरीरावरील जखम बरी न होता संसर्ग पसरत जातो. अनिकेतला प्रतिजैविके देण्यात येत होती. आश्रमशाळेतच काम करताना त्याला दुखापत झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.