शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ताक विकून भागवितोय शैक्षणिक खर्च

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

सुटीचा सदुपयोग : डोंगरावरील चिमुकल्याच्या धडपडीला पर्यटकांचाही प्रतिसाद

पेट्री : सातारा-बामणोली मार्गावर पेट्रीजवळ आठवीत शिकणारा एक विद्यार्थी दुपारच्या वेळी उन्हात पर्यटकांची तहान भागविण्यासाठी घरून तयार करून आणलेले ताक सध्या दिवाळी सुटीच्या वेळेत विकत आहे. अभ्यासाबरोबरच पुस्तकी ज्ञानाचा वापर व्यवहार ज्ञानात करताना दिसत आहे. यातून मिळालेल्या नफ्याचा वापर शैक्षणिक खर्चासाठी करणार असल्याचे त्याने ठरविले आहे. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखली जातात. आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेले ठिकाण म्हणून कासची ख्याती जगभरात पसरलेली असल्याने या परिसरात फुलांचा हंगाम असताना देश-विदेशातून पर्यटक पर्यटनासाठी येतात. सध्याच्या दिवाळी हंगामातदेखील मोठ्या संख्येने पर्यटक कास, बामणोलीकडे गर्दी करतात.सकाळ -संध्याकाळ हवेत गारवा असला तरीही दुपारच्या वेळेस उष्णतेची दाहकता भासत आहे. यावेळी सातारा तालुक्यातील अनावळेवाडी येथील पेटेश्वरनगर हायस्कूलमध्ये आठवीत शिकणारा अभिषेक दत्तात्रय शिंदे दिवाळीच्या सुटीत अभ्यासाबरोबरच रोज सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत पेट्रीजवळ रस्त्यावर ताक विकण्यासाठी हातात बोर्ड धरून बसतो. यातून पुस्तकी ज्ञानाची सांगड व्यवहारज्ञानाशी घालण्याचा तो रोजच्या रोज प्रयत्न करतो.गेल्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामात शाळेला सुटी असतेवेळी पर्यटकांच्या सेवेसाठी भर उन्हात ताक विक्रीस ठेवून चांगला नफा मिळविला होता. दरम्यान, झालेल्या नफ्याचा वापर आपल्या शैक्षणिक साहित्याच्या खचार्साठी करत असल्याचे त्याने सांगितले. (वार्ताहर)सध्या सुरू असलेल्या दिवाळी हंगामात ताकाचा एक पेला वीस रुपये याप्रमाणे विकला जातो. अनेक पर्यटक मी विद्यार्थी असल्यामुळे ताक घ्यायला थांबतात. मी दिवसभरात किमान चारशे पाचशे रुपये कमवतो. यातून काही पैसे बाजूला ठेऊन उरलेले घरी देतो. या पैशातून मी माझ्या शिक्षणाचा खर्च करतो. -अभिषेक शिंदे, विद्यार्थी, अनावळेवाडी