चोरट्यांची धाडस वाढली, एसटीमध्ये चढताना कटरने तोडून सोन्याची बांगडी लांबविली; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:37 IST2025-08-13T15:35:37+5:302025-08-13T15:37:19+5:30

घरी गेल्यानंतर हातात बांगडी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

A woman's gold bangle was stolen with a cutter while boarding an ST bus at Satara bus stand | चोरट्यांची धाडस वाढली, एसटीमध्ये चढताना कटरने तोडून सोन्याची बांगडी लांबविली; साताऱ्यातील घटना

संग्रहित छाया

सातारा : सातारा बसस्थानकामध्ये एसटीमध्ये चढताना माधुरी दादासाहेब पाटील (वय ५९, रा. ठाणे, मूळ रा. निंबवडे आटपाडी, जि. सांगली) यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची बांगडी हातोहात लांबविली.

विशेष म्हणजे अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील बांगडी कटरने अलगद कापली. गर्दीमुळे हातातील बांगडी चोरीस गेल्याचे लक्षात आले नाही, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधुरी पाटील या २९ जुुलै रोजी सातारा बसस्थानकात आल्या होत्या. त्या आटपाडी एसटीमध्ये चढत असताना गर्दी होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी कटरने तोडून चोरून नेली.

घरी गेल्यानंतर हातात बांगडी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी ११ ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हवालदार देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A woman's gold bangle was stolen with a cutter while boarding an ST bus at Satara bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.