शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: नुने येथील थिनर कंपनीत आगीनंतर भीषण स्फोट !, ११ महिला; ३ पुरुष बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:20 IST

वेळीच सर्वजण बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. लाखो रुपयांचे नुकसान

सातारा/किडगाव : मेढा-सातारा रस्त्यावरील नुने, ता. सातारा परिसरात असणाऱ्या थिनर कंपनीला भीषण आग लागली. या आगीनंतर थिनरने भरलेल्या चार बॅलरचे स्फोट झाल्याने मोठी दहशत पसरली. या आगीतून ११ महिला आणि ३ पुरुष बालंबाल बचावले. कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-मेढा रस्त्यावर नुने, ता. सातारा गावच्या हद्दीत रंगकामासाठी लागणारे थिनर बनविण्याची कंपनी आहे. या ठिकाणी मोठे पत्र्याचे शेड उभारले आहे. त्यामध्ये ११ महिला आणि ३ पुरुष काम करत होते. सोमवारी दुपारी कंपनीच्या उत्पादन विभागातून अचानक धूर निघू लागला.

काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. कंपनीतील कामगार महिला व पुरुष प्रसंगावधान राखून धावतच बाहेर आले. त्यानंतर काही क्षणातच एकापाठोपाठ एक असे चार स्फोट झाले. वेळीच सर्वजण बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला.

कंपनीमध्ये केमिकल पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वेगाने पसरली. सातारा, वाई येथूनही आठ ते दहा अग्निशमन दलाच्या गाड्या काहीवेळानंतर घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. रात्री दहाच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात जवानांना यश आले.

बघ्यांमुळे वाहतूक कोंडी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. या आगीमुळे वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या. आग पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सातारा तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

ही कंपनी बागवान नावाच्या व्यक्तीची आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समोर आले नाही. पंचनामा केल्यानंतरच आगीचे कारण समोर येईल. कंपनीतील सर्व कामगार सुखरुप आहेत. - शिवाजी वायदंडे, बीट अंमलदार सातारा तालुका पोलिस

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Thinning Company Fire: Explosion Averted, Workers Escape Unharmed

Web Summary : A major fire erupted at a thinner company in Satara, triggering explosions. Fortunately, 11 women and 3 men escaped unharmed. The cause is unknown; losses estimated in lakhs. Firefighters controlled the blaze after extensive efforts.