शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Satara-ZP Election: दोन्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी, काँग्रेस रणांगणात पण..

By नितीन काळेल | Updated: January 21, 2026 19:30 IST

भाजपची स्वतंत्र यादी येणार, काँग्रेस रणांगणात पण, किती ठिकाणी ?

नितीन काळेलसातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीत फाटाफूट झाली असून, भाजपची स्वतंत्र रणनीती आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येत असून, याअंतर्गत उमेदवारांना तुतारी आणि घड्याळ चिन्हांचा चाॅइस असणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, दुसरीकडे शिंदेसेनाही तयारीत असून, राष्ट्रवादीबरोबरही काही बाबतीत चर्चा सुरू आहे.जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. या निवडणुकीत महायुतीत ताळमेळ बसताना दिसत नाही. घटक पक्षातील शिंदेसेनेने एक हात पुढे केला असला, तरी भाजपकडून तेवढे सहकार्य झाले नाही. त्यातच भाजपचे नेतेच आक्रमक झाल्याने महायुतीत फाटाफूट झाल्याचे स्पष्ट आहे. त्याचबरोबर भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्यात. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी सकाळी उमेदवारांची यादी बाहेर पडणार आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीनेही गळ्यातगळे घालण्यास सुरुवात केली आहे. दोघेही निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.सध्या जागा वाटपांची बोलणी सुरू आहे. पण, या निवडणुकीत महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पक्षांतील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वापरण्याचा चाॅइस असणार आहे. म्हणजे दोन्ही पक्षांतील उमेदवार हे घड्याळ आणि तुतारी हे दोन्हीही चिन्ह चाॅइसनुसार वापरू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीत ताळमेळ बसल्याचेच स्पष्ट झाले आहे.शिंदेसेना पाटण, कोरेगाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघात ताकद लावून उभी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिंदेसेनेची बोलणी झाली असली, तरी त्यातून पुढे अजून काहीच आले नाही. यामध्ये महायुतीतील राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिंदेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपला अनेक ठिकाणी शह बसू शकतो. त्यामुळे शिंदेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले असेल हे नक्की.

काँग्रेस रणांगणात पण, किती ठिकाणी ?जिल्ह्यात या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीअंतर्गत फाटाफूट झाल्यातच जमा आहे. तर, महाविकास आघाडीही एकसंघ असल्याचे दिसत नाही. कारण, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसपुढे अडचण आहे. काँग्रेसला स्वतंत्र लढावे लागणार आहे. यासाठी पक्षाकडून तालुकाध्यक्षांना स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावेत, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे काँग्रेस जिल्ह्यात किती ठिकाणी लढणार हे अजून कोडेच आहे. तर, उद्धवसेनेची ताकदही तोकडीच आहे. यामुळे महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेस आणि उद्धवसेनेची उडी कुठपर्यंत पडणार हे पाहावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Shinde Sena explores alliance with NCP; Congress uncertain.

Web Summary : Satara ZP elections see Mahayuti rift, BJP's independent strategy. Shinde Sena explores NCP alliance while Congress faces uncertainty, deciding local battles independently. Seat sharing talks are ongoing.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसBJPभाजपा