Crime News: पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:22 AM2022-10-18T10:22:13+5:302022-10-18T10:23:43+5:30

सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

A minor girl was molested by the police, a case under POCSO was registered in satara | Crime News: पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Crime News: पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

googlenewsNext

सातारा - रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. सातारा ते कोल्हापूर एसटी प्रवासादरम्यान एका पोलिसानेच अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. याबाबतच्या तक्रारीनंतर संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महाविद्यालयीन युवतीसोबत आश्लिल चाळे केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान याबाबत संबंधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊनच तिथे हजर झाले आणि छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले. 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा संपवून कोल्हापूरला जात असताना आरोपी मगदूम यांनी अल्पवयीन मुलीसोबत हे कृत्य केले. 

संबंधित कर्मचारी हा कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे. कोल्हापूर पोलीस खात्यात तो खेळाडू आहे. सातारा शहरात सुरु असलेल्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो आला होता. या घटनेतील महाविद्यालयीन युवतीने कराड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संशयित आरोपी महेश मगदूम याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, संशयीत आरोपी पोलीस महेश मगदूम ला बोरगाव पोलिसांनी हजर राहण्याची बजावली नोटीस आहे. तसेच, या कोल्हापूर पोलिसावर कलम 354 विनयभंग आणि पोस्कोच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

Web Title: A minor girl was molested by the police, a case under POCSO was registered in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.