"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:48 PM2024-06-12T22:48:17+5:302024-06-12T22:50:48+5:30

Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

I would have won Baramati seat 1000 percent by contesting as an independent says Vijay Shivtare | "बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान

"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान

Vijay Shivtare ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळी देशभरात चर्चा झाली. या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशीच लढत होती. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढली. या मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, नंतर त्यांनी माघार घेतली. दरम्यान, आता निकालानंतर शिवतारे यांनी बारामती मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं आहे. 

मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा

लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली होती तेव्हा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. यावेळी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. नंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती करुन शिवतारे यांना माघार घ्यायला सांगितली. दरम्यान, आता शिवतारे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. टीव्ही नाईन या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बारामती लोकसभेवर भाष्य केलं आहे. 

"महायुतीची जागा निवडून यावं असं सगळ्यांचं मत होतं, मी त्यावर बोलणार नाही. मी ही जागा १ हजार टक्के अपक्ष म्हणून जिंकली असती. कारण या दोघांनाही किती विरोध होता हे मला माहित होतं. इथं पक्ष नाही, इथे दोन प्रकारचे मत प्रवाह आहेत. एक पवार प्रो. आणि एक पवार विरोधी, लोकांना यांनाही आणि त्यांनाही मतदान करायचं नव्हतं, असंही विजय शिवतारे म्हणाले. 

"पवार साहेबांनी कोणाचही ऐकून बोलायला नको"

खासदार शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या जमिनीच्या मुद्द्यावर बोलताना विजय शिवतारे म्हणाले, कोणाचही ऐकून जाहीर स्टेटमेंट देत असतील तर माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो. तुम्ही कोणाचही ऐकून नका ना बोलू. विजय शिवतारेने जे काही केलं आहे ते सगळ्यांना माहित आहे. मी सगळं उघड-उघड केलं आहे, असंही शिवतारे म्हणाले.

Web Title: I would have won Baramati seat 1000 percent by contesting as an independent says Vijay Shivtare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.