"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका

By संदीप बांद्रे | Published: June 12, 2024 09:17 PM2024-06-12T21:17:10+5:302024-06-12T21:22:08+5:30

महाविकास आघाडीची सत्ता तर येणारच आहे. रामदास कदमांचे पार्सल देखील आम्ही परत पाठवून देणार आहोत.

Former MLA Sanjay Kadam criticized on ramdas kadam in a meeting in Chiplun | "रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका

"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका

चिपळूण : महाविकास आघाडीची सत्ता तर येणारच आहे. रामदास कदमांचे पार्सल देखील आम्ही परत पाठवून देणार आहोत. पण भास्करराव तुम्ही गृहमंत्री व्हा आणि येथील पोलीस यंत्रणा फक्त आमच्या ताब्यात द्या, मग बघा....रामदास कदम यांची दादागिरी मोडून काढून संघटना कशी उभी करतो ते तुम्हीही बघाल, ५० हजाराचे मताधिक्य मिळवून देण्याची वलग्ना करणारे बामलावे आता कुठे शेपूट घालून बसलेत, आशा शब्दात नवनियुक्त जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी जोरदार वक्तव्य केले. 

चिपळूण येथील मतदार आभार मेळाव्यात ते संजय कदम हे बोलत होते. जिल्हाप्रमुख पद माझ्याकडे देऊन पक्षप्रमुखांनी माझ्यावर फार मोठा विश्वास दाखवला आहे. मी संघर्षातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. हे उद्धवजीना माहीत आहे. रामदास कदम ही घाण आम्हीच १९९० मध्ये येथे आणली. पण त्यावेळी केशवराव भोसले म्हणाले होते, काही वर्षाने हाच माणूस तुमचे आईबाहीन काढेल. ते सत्य आज आमच्या समोर आले आहे. प्रत्येक गोष्टीत रामदास कदम त्रास देत आहेत. छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. प्रशासनाला हाताशी धरून कार्यकर्त्यांवर केसेस, तडीपारच्या नोटीसा दिले जात आहेत. पण त्यांच्या दादागिरीला मी भीक घालत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे.असेही कदम यांनी स्पष्ट केले.

 संजय कदम पुढे म्हणाले की, भास्करराव तुम्ही माझे पालकत्व घ्या, मला साथ द्या, माझ्या मतदारसंघात वेळ द्या आणि जिल्हाप्रमुख म्हणून मला काही अधिक अधिकार द्या, माझी काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मला पळणारा कार्यकर्ता हवा आहे. पद घेऊन मिरवणारा कार्यकर्ता मला मुळीच नको. त्यामुळे संघटनेत काही फेरबदल मला करावेच लागतील. येणारी प्रत्येक निवडणूक ही माझी स्वतःची निवडणूक आहे असे समजून काम करणारा कार्यकर्ता मला हवा आहे. तो मी तयार करणार आहे. त्यासाठी तुमची सर्वांची साथ मला हवी आहे. मी सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे, असेही शेवटी स्पष्ट केले.

Web Title: Former MLA Sanjay Kadam criticized on ramdas kadam in a meeting in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.