९९ ग्रामपंचायतींसाठी ८२.६० टक्के मतदान

By Admin | Updated: November 1, 2015 23:49 IST2015-11-01T23:49:29+5:302015-11-01T23:49:29+5:30

खंडाळ्यात सर्वाधिक ९४ टक्के

82.60 percent polling for 99 panchayats | ९९ ग्रामपंचायतींसाठी ८२.६० टक्के मतदान

९९ ग्रामपंचायतींसाठी ८२.६० टक्के मतदान

सातारा : जिल्ह्यातील ९९ सार्वत्रिक आणि
१९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी
१ लाख १९ हजार १६३ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात ८२.६० टक्के मतदान शांततेत पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाने आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा गेल्या महिन्यात जाहीर केला होता. सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील तब्बल ६१ ग्रामपंचायती आहेत, तर जिल्ह्यात तब्बल ९९ ग्रामपंयायतींच्या ६३५ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली.
या जागांसाठी २ हजार ३०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १९ ग्रामपंचायतींच्या २५ रिक्त जागांसाठी
मतदान झाले. तालुकानिहाय मतदान आकडेवारी अशी : सातारा ८०.९२ टक्के, कोरेगाव ८५.६५, जावळी ८४.२४, कऱ्हाड ८१.३७, पाटण ८१.९५, फलटण ९१.३५, माण ९०.०८, खटाव ८५.६१, वाई ८५.६२, महाबळेश्वर ८७.६९, खंडाळा ९४.४७ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)
सातारा तालुक्यात सर्वांत कमी
सातारा तालुक्यात ८०.९२ टक्के मतदान झाले. इतर तालुक्यांमध्ये जास्त झाले. तर खंडाळा तालुक्यामध्ये सर्वाधिक ९४.४७ टक्के इतके मतदान झाले.
उद्या मतमोजणी
जिल्ह्यात रविवारी झालेल्या ९९ ग्रामपंचायतींच्या तसेच १९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची उद्या, मंगळवारी मतमोजणी होणार आहे. मतदान पूर्ण होताच कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 82.60 percent polling for 99 panchayats