शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

६४७ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

By admin | Updated: November 8, 2015 23:39 IST

शशिकांत शिंदे : अधिकारी, शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

कोरेगाव : भूविकास बँकेचे कर्ज भरलेल्या सातारा तालुक्यातील निगडी आणि वर्णे येथील अनुक्रमे श्रीकृष्ण व काळभैरव पाणीपुरवठा संस्थेच्या ६४७ शेतकरी सभासदांनी कर्ज भरले असल्याने त्यांचा सातबारा उतारा तातडीने कोरा करण्यासाठी तहसीलदार व तलाठ्यांना आदेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. सलग दहा वर्षे या विषयावर लढा दिला आणि शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले असल्याने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये निगडी व वर्णे येथील शेतकरी सभासदांची बैठक आ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम, बँकेचे व्यवस्थापक सोनावणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आ. शिंदे यांनी सर्वप्रथम या शेतकऱ्यांनी कर्जे भरली आहेत, त्यांचे सातबारा कोरा करण्याबाबत तातडीने संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, असे निर्देश डॉ. कदम यांना दिले. शिंदे म्हणाले, ‘जावळीतून आमदार असताना त्या तालुक्यातील पाणी योजनांबाबत प्रयत्न केले. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्यानंतर शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन एकरकमी परतफेड योजनेचा अध्यादेश काढले आणि त्याचा लाभ शेतकरी सभासदांना झाला. या योजनेला मुदतवाढ देखील देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब होती. या योजनेअंतर्गत निगडी येथील श्रीकृष्ण पाणीपुरवठा संस्थेच्या ५३७ सभासद शेतकऱ्यांनी १ कोटी ८६ लाख ३७ हजारांचे कर्ज घेतले होते. बँकेने ३३१ सभासदांकडून शंभर टक्के कर्जवसुली करत २ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपये वसूल केले आहे, तर वर्णे येथील काळभैरव पाणीपुरवठा संस्थेच्या ६७३ सभासदांनी ३ कोटी ४७ लाख रुपये कर्ज घेतले होते. बँकेने ३१६ सभासदांकडून शंभर टक्के कर्जवसुली करत ३ कोटी ९६ लाख ७४ हजार रुपये वसूल केले आहेत. त्यांचे सातबारा उतारे कोरे होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी तहसीलदार व तलाठ्यांना आदेश द्यावेत,’ अशा सूचना आ. शिंदे यांनी बैठकीत दिल्या. उर्वरित शेतकऱ्यांबाबत शासनाने तातडीने पावले उचलून निर्णय घ्यावा, यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असून, चर्चा करणार आहे. त्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ मुद्दल रक्कम घेण्याबाबत प्रयत्न ‘भूविकास बँकेचे कर्ज थकित झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने बोजे चढविले आहेत. वाढते व्याज आणि व्याज मुद्दलीकरण, या विषयावर शासनाकडे सातत्याने लढा दिला. या विषयावर संबंधित मंत्र्यांकडे विशेष बैठका घेतल्या आणि एकरकमी परतफेड योजनेबाबत अध्यादेश काढण्यास शासनाला भाग पाडले. सलग दहा वर्षे या विषयावर मी काम करत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल वसूल केले जावे, यासाठी प्रयत्न करणार असून, हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे,’ असे आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.