शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के पोलिसांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अधिकारी आणि पोलिसांना आता लसीचा दुसरा डोस देण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अधिकारी आणि पोलिसांना आता लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. पहिल्या डोसला पोलिसांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु दुसऱ्या डोसवेळी प्रतिसाद कमी मिळत असल्याचे पाहायला मिळते. खरं तर पोलिसांना त्यांच्या घरातूनच लस घेण्यासाठी आग्रह होतोय. ही एक महत्त्वाची जमेची बाजू आहे.

कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिसांनी आपल्या छातीची ढाल करून नागरिकांची सुरक्षा केली. याच पोलिसांना आता स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस दलाने सर्वांनाच लस घेण्यासाठी सक्ती केली आहे. पहिल्या डोसवेळी जिल्हा पोलीस दलातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लस घेताना चांगला उत्साह दाखवला. २५३४ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतलाय, तर दुसरा डोस केवळ २५५ कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. काहीजणांनी दुसऱ्या डोसची तारीख चुकल्यामुळे लसीकरण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही दुसरा डोस घेऊ शकतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे असून, पोलिसांनी हा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना व्यस्त ड्युटीमुळे डोस घेता आला नाही. अशा कर्मचार्‍यांना घरातूनच आता लस घेण्यासाठी आग्रह होऊ लागला आहे. पोलीस हे रात्रंदिवस बाहेर असतात. अनेक लोकांशी संपर्क येत असतो. यातूनच त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. ही घरच्यांना त्यांच्या काळजी आहे. त्याचबरोबर पोलिसांकडूनही लस घेण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुसरा डोसही सर्व पोलीस घेतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

चौकट : २० टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस

ज्याप्रमाणे कोरोनाचा पहिला डोस घेण्यासाठी पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला, तसा प्रतिसाद दुसऱ्या डोसला मिळाला नाही. केवळ २५५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही अनेकजण डोस घेणे बाकी असून, येत्या काही दिवसात हे कर्मचारी लस घेतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकटः ३० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस

जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून लस घेण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यातील काही महिला आजारी आहेत, तर काही महिलांनी वैयक्तिक कारणातून लस घेतली नसल्याचे बोलले जात आहे.

गरोदर मातांना लस दिली जात नाही. त्यामुळे पोलीस दलातील अशा महिलाही या लसीपासून वंचित राहिले आहेत. हा आकडाही मोठा असल्याचे बोलले जाते. तसेच लसीबाबत अद्यापही अनेकांचा गैरसमज दूर झाला नाही. हे एक लस न घेण्यापाठीमागचे महिला पोलिसांचे कारण असू शकते.

चौकट

जिल्ह्यात एकूण पोलीस

३३२८

लस घेतलेले अधिकारी

१३४

जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी

१६८

लस घेतलेले पोलीस कर्मचारी

२४००