शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२.४४ लाख बालक ांना पल्स पोलिओचे डोस

By admin | Updated: January 20, 2015 00:00 IST

दिलीप माने : ऊसतोड मजुरांची पाले, विटभट्ट्यांवरही राबविली मोहीम

सातारा : ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत सोमवारी जिल्ह्यातील पाच वर्षांखालील २ लाख ४४ हजार ६१९ बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले,’ अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांनी दिली.पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार २८३ व शहरी भागात १४८ अशी एकूण २ हजार ४३१ पोलिओ लसीकरण बुथ उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, टोलनाके आदी ठिकाणी ग्रामीण भागात १०६ व नागरी भागात २८ अशी एकूण १३४ पल्स पोलिओ ट्रान्झिट बुथ कार्यरत होती. ग्रामीण भागात १३९ व शहरी भागात ३६ व मोबाईल मेडिकल युनिट १ अशा १७६ मोबाईल टीमनी वीटभट्ट्या, बांधकामावरील कामगार, ऊसतोड मजूर आदी या ठिकाणी काम करणाऱ्या मजूरांच्या बालकांना डोस पाजण्याचे काम चोख बजावले. मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागात मिळून ५ हजार ९८२ अधिकारी व कर्मचारी तसेच ४८५ पर्यवक्षक कार्यरत होते. जिल्ह्यात या मोहिमेसाठी १ हजार ९२३ टीमस तयार केल्या. जिल्ह्यात नोंदण्यात आलेल्या २ लाख ४२ हजार ८५७ लाभार्थ्यांपैकी ग्रामीण भागात २ लाख २० हजार ४०८ तर शहरी भागात २४ हजार २११ असे एकूण २ लाख ४४ हजार ६१९ बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले. चुकून पोलिओचा डोस घेण्याचे राहून गेलेल्या बालकांना २२ पर्यंत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकांमार्फत पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. पल्स पोलिओच्या दुसऱ्या टप्प्यात २२ फेब्रुवारी रोजीही आपल्या पाच वर्षांखालील बालकांना बुथवर घेऊन यावे, असे आवाहनही डॉ. माने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)