शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या १३ सायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : शहरामध्ये सायकलचोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख ...

सातारा : शहरामध्ये सायकलचोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या १३ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती अशी, दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १ ते ३ च्या दरम्यान गणेश भगवान तळेकर (रा. विलासपूर गोडोली) यांच्या राहत्या घरासमोर लावलेली त्यांची गिअरची आठ हजारांची सायकल चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. शहरात सायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार एलसीबीमध्ये सायकल चोरट्यांचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना झाली होती. या पथकाने सायकलचोरीबाबत तपास सुरू केला असतानाच दि. २० रोजी पाडळी, ता. सातारा येथील एका व्यक्तीने साथीदारांसह गोडोलीत चोरलेली सायकल व सातारा शहरातून आणखी काही सायकला चोरलेल्या असून त्या गावातील लोकांना विकल्या आहेत, अशी खबर एलसीबीला मिळाली.

याबाबत खात्री करून कारवाई करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने पाडळी, ता. सातारा येथे जाऊन संबंधित मुलास ताब्यात घेऊन तपास केला असता, तो विधी संघर्षग्रस्त बालक असून तो व त्याचे इतर दोन साथीदार यांनी गेल्या वर्षामध्ये सातारा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सायकली चोरल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून

एकूण १३ सायकली जप्त केल्या.

दोन विधी संघर्षग्रस्त मुलांना गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बाल न्याय मंडळ सातारा यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. त्यानंतर, त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार यांनी केली.

दरम्यान, ज्यांच्या सायकली चोरीस गेल्या असतील, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.