शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बारावी पास आमदारांनी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करावा

By admin | Updated: August 18, 2014 21:35 IST

मनोज घोरपडे : वातावरण बदलल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून बेताल वक्तव्ये

कोरेगाव : बारावी पास आमदारांनी प्रत्येक क्षेत्राचा नीट अभ्यास करावा. मगच व्यवस्थित प्रतिक्रिया द्यावी, असा सणसणीत टोला कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी लगावला.आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रामाणिकपणे ऊर्जा क्षेत्राला बळ देण्यासाठी पवनचक्की उभारणीत करिअर केले म्हणून आमदारांना पोटशूळ उठण्याचे कारण नाही. आम्ही राजकारणातून कधी पैसा हडप केला नाही की शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन राजकारण केले नाही. स्वत:च्या साखर कारखान्यात टनाला एकशे सत्तर किलो काटामारी करून शेतकऱ्यांच्या उसाची फसवणूक केली नाही, असे सांगून घोरपडे पुढे म्हणाले की, ‘आम्ही कायदेशीर पवनचक्की प्रकल्प उभा करून तब्बल सातशे बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. शासनाला महसूलही दिला आहे. वीज टंचाईने ग्रासलेल्या राज्याला ऊर्जाही मिळवून दिली आहे. हे सारे डोळ्याआड करून अर्धवट शिक्षणाच्या अज्ञानातून बेताल वक्तव्य करण्यास आमदारांनी सुरुवात केली आहे. रिकीबदारवाडी, ता. कोरेगाव येथे बैठकीत त्यांनी ग्रामस्थाशी संपर्क साधला. या गावाने आतापर्यंत सत्ताधारी नेत्यांना झुकते माप दिले. मात्र, पदरात कधीच काही टाकले नाही. स्मशानभूमीचा प्रश्न व कब्रस्तानच्या वॉल कम्पाउंडच्या प्रश्नालाही त्यांना न्याय देता आला नाही. निवडणुका झाल्या की विकासकामांपेक्षा वेळकाढूपणा करायचा हेच त्यांचे जुने उद्योग आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

स्वत:चे अर्धवट शिक्षण झाकण्यासाठी कसरत‘कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी स्वत:चे अर्धवट शिक्षण झाकण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याशी स्वत:ची तुलना करतात. ते श्रेष्ठ नेते कुठे अन् तुमची शैक्षणिक पात्रता काय ? याचा तरी किमान तुलना करताना विचार करायला हवा होता,’ अशीही खरमरीत टिका मनोज घोरपडे यांनी केली. पातळी सोडून आमच्या कुटुंबावर वैयक्तिक टिका कराल तर तुमच्यावर समाजात लपवून तोंड फिरण्याची वेळ येईल, असाही इशारा यावेळी घोरपडे यांनी दिला.