शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात ११९ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

फलटण : जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ११९ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये ...

फलटण :  जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ११९ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात ३४ व्यक्ती तर ग्रामीण भागात ८५ रुग्ण सापडले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच ११९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून, ही बाब चिंताजनक आहे. भाजी मंडईत प्रचंड गर्दी होऊन सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.

फलटण शहरात ३४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये फलटण ९ , लक्ष्मीनगर ९, मलटण ४, कसबा पेठ ४, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ १, शिंपी गल्ली १, नारळी बाग १, पुजारी कॉलनी १ तसेच तेली गल्ली येथील एका व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ग्रामीण भागात ८५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये विडणी द्हाबिघे १३, विडणी ३, तरडगाव ८, अलगुडेवाडी ८, कोळकी ५, साखरवाडी ४, शिंदेघर १, खुंटे १, ठाकुर्की १, राजुरी २, हिंगणगाव १, सासवड ३, फरांदवाडी १, बरड ४, जावली ४, फडतरवाडी ३, गुणवरे १, ताथवड १, शिंदेवाडी १, सांगवी २, दुधेबावी १, पवारवाडी १, खटकेवस्ती ३, राजाळे ४, साटेफाटा १, सरडे १, जाधववाडी २, चौधरीवाडी १, तडवळे १, आळेवाडी १, धुळदेव १ तसेच मुंजवडी येथील एका व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, फलटण शहरात शंकर मार्केट येथे भरणाऱ्या मंडईमध्ये सकाळच्या वेळी भाजी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असून, भाजी विक्रेते एकमेकांना चिकटून बसत असल्याने तसेच खरेदी करणारे व विक्री करणारे मास्क घालत नसल्याने कोरोनाचा धोका वाढलेला आहे. भाजी मंडईच्या ठिकाणी नागरी वस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग गर्दीमुळे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मंडईमध्ये भाजीविक्रेते एकमेकांपासून लांब बसवून विनामास्क वावरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आणि नगरपालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. दुपारी १२ नंतर भाजी विक्रेते उठून दुसरीकडे जात असतात. त्या वेळी ते बसलेल्या ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या केर, कचऱ्याची त्वरित साफसफाई करणे गरजेचे आहे. वेळोवेळी गर्दीच्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून आणि भाजी विक्रेत्यांकडून होत आहे.

कोट...

फलटण शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. फलटण नगर परिषद फारच दुर्लक्ष करीत आहे. शंकर मार्केट व राजवाडा परिसरात भाजी विक्रेते अक्षरश: मेन रोडवर भाजी विकायला बसतात. रोज या ठिकाणी अपघात होतात. नागरिक व वाहनांची प्रचंड गर्दी असते. नगर परिषद याकडे का दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत व सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी वरिष्ठांनी यात लक्ष घालावे.

- अनिल जाधव, माजी नगरसेवक