सातारा : शासनाच्या विविध योजनांमधून शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी ११ कोटींचा निधी मंजूर झाला आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाढीव पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या टाकण्याच्या कामामुळे सातारा शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. रस्त्यांच्या कामासाठी निधी अपुरा पडत होता. त्यामुळे पालिकेच्या वतीने शासनाकडे रस्त्यांच्या विकासासाठी १६ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली होती. यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या महाराष्ट्र नगरोत्थान अभियान योजनेतून सातारा शहरातील रस्त्यांसाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आली असून नगरोत्थामधून उपलब्ध झालेला निधी प्रशासनाने पालिकेकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}