सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:08+5:302021-07-18T04:20:08+5:30

सांगली : शहरातील वडर कॉलनी परिसरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर चाकूने वार करत त्यास जखमी केले. ...

Young man stabbed in Sangli | सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार

सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार

सांगली : शहरातील वडर कॉलनी परिसरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर चाकूने वार करत त्यास जखमी केले. दत्ता ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव असून दत्ताचा भाऊ सागर चव्हाण याने रोहित ऐवळे, कैलास दिलीप पवार आणि चेतन वडर (सर्व राहणार वडर गल्ली, सांगली) यांच्याविरोधात विश्रामबाग पाेलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सागर चव्हाण आणि संशयित हे एकमेकांचे मित्र असून चव्हाण व संशयितांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. शनिवारी दुपारी चव्हाण आपल्या भावासोबत बोलत थांबला असताना संशयित तेथे आले व त्यांनी शिवीगाळ सुरू केली. यातून वादावादी वाढल्यानंतर संशयित ऐवळे याने चव्हाण याचा भाऊ दत्ता चव्हाण (वय २०) याच्या उजव्या बाजूस पोटावर, छातीवर व डाव्या हाताच्या पंज्यावर धारदार हत्याराने वार करून त्यास गंभीर जखमी केले. यानंतर दत्ता यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची विश्रामबाग पोलिसात नाेंद असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Young man stabbed in Sangli