कोंगनोळीतील तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:03+5:302021-04-11T04:27:03+5:30

अक्षय बेडगे हा तरुण घरी कुणालाही न सांगता घरातून दि. ९ मार्च रोजी निघून गेला होता. तो घरी आला ...

Young man commits suicide in Kongnoli | कोंगनोळीतील तरुणाची आत्महत्या

कोंगनोळीतील तरुणाची आत्महत्या

अक्षय बेडगे हा तरुण घरी कुणालाही न सांगता घरातून दि. ९ मार्च रोजी निघून गेला होता. तो घरी आला नाही म्हणून त्याच्या पालकांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात १५ मार्च रोजी वर्दी दिली होती. पोलिसांची ही शोधमोहीम चालू होती; पण अक्षयचा शोध लागत नव्हता.

शनिवारी रांजणी येथील शेळी-मेंढी फार्मनजीक वन विभागाच्या कुरणात एका मेंढपाळाला काटेरी झुडपामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेला मृतदेह आढळून आला. जास्त दिवसाचा मृतदेह असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मेंढपाळाने ही घटना रांजणीच्या पोलीस पाटलांना सांगितली. यानंतर त्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

जास्त दिवसाचा मृतदेह असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. यावेळी घटनास्थापासून काही अंतरावर दुचाकी (क्र. एमएच १० सीके ७६७३) आढळून आली. दुचाकीच्या नंबरवरून मृताची ओळख पटविण्यात आली. मृत अक्षय हा होतकरू, हुशार होता. शिक्षण घेतल्यानंतर वडिलांच्या सेंट्रिंग व्यवसायात हातभार लावत होता.

Web Title: Young man commits suicide in Kongnoli