शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खरसुंडीत यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे सिद्धनाथ देवाची पौष यात्रा आणि खरसुंडी, नेलकरंजी, माणेवाडी दर्यातील प्रसिध्द त्रिवार्षिक यात्रा ...

खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे सिद्धनाथ देवाची पौष यात्रा आणि खरसुंडी, नेलकरंजी, माणेवाडी दर्यातील प्रसिध्द त्रिवार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली होती; परंतु लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्या प्रयत्नाने प्रशासनाने पारंपरिक पद्धतीने मोजक्याच मानकरी, सेवेकरी भाविकांच्या उपस्थितीत उत्सव सोहळ्यास परवानगी दिली.

या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात खरसुंडी सिद्धनाथाची पालखी उत्सव मूर्तीसह खरसुंडी सिध्दनाथ मंदिरातून घोडेकुर, धावडवडी, औटेवाडी, नेलकरंजी माणेवाडी दर्यात दाखल झाली. पारंपरिक विधिवत पूजा अर्चा करून पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता त्याच मार्गाने खरसुंडी सिध्दनाथ मंदिरात परतली. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

यावेळी पोलिसांना सोहळा सुरळीत पार पाडताना तारेवची कसरत करावी लागली. कोणताही अनुचित प्रकार न घडता हा पारंपरिक सोहळा पार पडल्याने देवस्थान समितीने समाधान व्यक्त केले. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, युवक काँग्रेसचे नेते जयदीप भोसले उपस्थित होते. देवस्थान समितीने योग्य नियोजन केले; तर आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देेवकर, पोलीस सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

फोटो-२८खरसुंडी३

फोटो ओळ : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथाचा पालखी उत्सव पारंपरिक पद्धतीने पार पडला.