शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन इमारतीचे काम लाल फितीत

By admin | Updated: September 7, 2015 22:56 IST

वकिलांचे मंत्रालयाकडे हेलपाटे : ए विंग इमारतीसाठी अद्याप बारा कोटींच्या निधीची गरज

अंजर अथणीकर - सांगली --सुमारे सहा वर्षांपूर्वी सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे पायाभरणी झालेल्या न्यायालयीन इमारतीचे ए विंगचे बांधकाम आता पूर्णत्वाकडे आले असतानाच, बी विंगसाठी मात्र प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने याचे कामकाज रखडले आहे. प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी वकील संघटनांचे आता मंत्रालयाकडे हेलपाटे सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला ए विंग इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले असले तरी, यासाठी अद्याप दहा ते बारा कोटींची गरज असल्यामुळे याचे काम आता संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. विजयनगर येथील चार एकर जागेमध्ये न्यायालयाच्या दोन इमारतीच्या बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. याचा पायाभरणी समारंभही सहा वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. मूळ ४२ कोटींचा असणारा हा प्रकल्प आता ५० कोटींकडे गेला आहे. ए विंग ही न्यायालयाची मुख्य इमारत आहे. यामध्ये सांगलीतील सर्व जिल्हास्तरीय न्यायालये, ग्रंथालय, वकिलांची बाररूम आदींचा समावेश आहे. बी विंग इमारतीमध्ये लोक न्यायालय (तडजोडी), कनिष्ठ चार न्यायालये, बँकिंग व्यवस्था, एटीएम, वायफाय सुविधा, विश्रामगृह, कँटीन आदी उच्च न्यायालयाने सूचवलेल्या पायाभूत सुविधा यामध्ये देण्यात येणार आहेत.आतापर्यंत ए विंगच्या इमारतीवर २२ कोटी रुपये खर्च झाले असून, ही इमारत जवळपास पूर्णत्वास आली आहे. यासाठी अद्याप दहा ते बारा कोटींची गरज आहे. अंतर्गत रस्ते, वीज पुरवठा, फर्निचर, सुशोभिकरणाचे काम थांबले आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले असले तरी याठिकाणी न्यायालय स्थलांतर होण्यासाठी अजून किमान वर्षभर लागण्याची शक्यता आहे. सांगली, मिरजेतील कोणती न्यायालये याठिकाणी स्थलांतरित होणार, हे आता उच्च न्यायालय ठरवणार आहे. बी विंग इमारतीला प्रशासकीय मान्यताच न मिळाल्याने याचे बांधकाम थांबले आहे. या इमारतीचे बांधकाम न झाल्यास पुन्हा न्यायालय व इतर पायाभूत सुविधांपासून वकील, पक्षकार वंचित राहणार आहेत. याबाबत वकील संघटना आता मंत्रालयाकडे प्रशासकीय मंजुरीसाठी हेलपाटे मारत आहेत. मध्यंतरी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने सचिव स्तरावरील बोलणीही केल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही संघटनेकडून सांगण्यात येत आहे.सांगलीतील इमारतीवर ताण सांगलीत सध्या असलेली न्यायालयीन इमारत ही सुुमारे शंभर वर्षे जुनी आहे. याठिकाणी सध्या पंधराहून अधिक न्यायालयाचे काम चालते. दोन न्यायालयाचे कामकाज सध्या जागेअभावी एकाच न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे न्यायदानाचे काम गतीने होण्यास अडथळे येत आहेत. त्याचबरोबर सांगली न्यायालयात रोज येणाऱ्या वकिलांची संख्या हजारहून अधिक असून, दोन हजारहून अधिक पक्षकारही येत असतात. त्यांच्यासाठी ही जागा अत्यंत अपुरी पडत आहे. बी विंग न्यायालयीन इमारतीला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. यामुळे निधी मिळवण्यात अडथळे येत आहेत. ही इमारत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय सांगलीतील सर्व न्यायालय याठिकणाी स्थलांतरित होणे अशक्य आहे. बार असोसिएशनच्यावतीने लवकरच याच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यात येणार आहे.- अ‍ॅड. आर. आर. पाटील, अध्यक्ष, बार असोसिएशन, सांगली