शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

तीस हजारांची लाच घेताना महिला वनक्षेत्रपाल जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लाकडाची वाहतूक करताना पकडलेला ट्रक सोडून देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराच्या लाचेची मागणी करून ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लाकडाची वाहतूक करताना पकडलेला ट्रक सोडून देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराच्या लाचेची मागणी करून ती डाटा ऑपरेटरकरवी स्वीकारल्याप्रकरणी तासगाव येथे महिला वनक्षेत्रपालावर कारवाई करण्यात आली. कौशल्या हणमंत भोसले (वय ३२, मूळ रा. चांदणी चौक, रहिमतपूर, जि. सातारा, सध्या तासगाव) असे महिला अधिकाऱ्याचे नाव असून, श्रीकांत तुकाराम शिंदे (४३, रा. मणेराजुरी ता. तासगाव) या डाटा ऑपरेटरला लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार त्याच्या मालकीच्या ट्रकमधून लाकडाची वाहतूक करत असताना, वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले हिने कारवाई करत ट्रक तासगावातील वन परिक्षेत्र कार्यालयात आणून लावला होता. यानंतर ट्रक सोडून देण्यासाठी भोसले व ऑपरेटर शिंदे याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून अर्ज केला. या विभागाने केलेल्या पडताळणीत वनक्षेत्रपाल भोसलेने ३० हजारांची मागणी करून ती रक्कम शिंदे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले होते.

गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तासगाव येथील वन परिक्षेत्र कार्यालयात सापळा लावला. यावेळी ऑपरेटर शिंदे याने लाचेची मागणी करून ती स्वीकारताना त्यास पकडण्यात आले, तर शिंदे याला लाच स्वीकारण्यास सांगितले म्हणून भोसले हिला कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. भोसले हिच्या सांगण्यावरूनच लाच स्वीकारण्यात आली होती. दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, धनंजय खाडे, संजय संकपाळ, सलीम मकानदार, अजित पाटील, राधिका माने, विना जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कोट

कोणत्याही शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने काम करताना लाचेची मागणी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कोणालाही अशी रकमेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

सुजय घाटगे, उपअधीक्षक, लाचलुचपत.