शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कातकऱ्यांसाठी तांबडं फुटणार?

By admin | Updated: September 7, 2015 22:59 IST

वेठबिगारीचं जिणं : हंगामी स्थलांतर रोखण्याचे प्रयत्नच नाहीत

खेर्डी : पोटासाठी काम हवं. मग, रोजगार शोधण्यासाठी आदिवासी-कातकरी समाजाचे हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत. परिणामी, अंगावर घेतलेले पैसे आणि त्याच्या परतफेडीसाठी नव्या युगातले वेठबिगार बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे कातकऱ्यांच्या जीवनात तांबडं कधी फुटणार? हा प्रश्न प्रत्ययकारी बनला आहे. दोन दशकांपूर्वी आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून या समाजासाठी निधीची तरतूद सुरु झाली. यासाठी राज्य शासनाला केंद्राचेही भरीव अर्थसहाय्य मिळाले. मात्र, २०१०पर्यंत आदिवासींच्या हक्काची ८ हजार ७३ कोटी ९८ लाख एवढी प्रचंड रक्कम अखर्चित राहिली होती. सामाजिक न्यायाची एवढी चेष्टा पुरोगामी महाराष्ट्रात झाली हेच त्यातून दिसून आले. समर्थन संस्थेने यासंदर्भात धक्कादायक अहवाल प्रसिध्द केला होता. यानंतर ही शासकीय पातळीवरील उदासीनता कायम राहिल्याने कोकणातील आदिवासी कातकरी समाजाचे हंगामी स्थलांतर सुरुच राहिले. एवढेच नव्हे; तर आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रात हा समाज डर्मुखलेला राहिला. यामुळे ९१.११ टक्के निरक्षरता, ८३ टक्के भूमिहीन, ७० टक्के कुटुंबाकडे अत्यल्प जमीन अशा बिकट व विपरित स्थितीत कातकऱ्यांना जीवन कंठावे लागतेय. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता १५ टक्के लोक उत्तर रत्नागिरीत जंगलतोडीसाठी, ऊस तोडणीसाठी हंगामी स्थलांतर करणारे २० ते २२ टक्के, तर मध काढणीसाठी कोयना, पाचगणी, महाबळेश्वर येथे ७ ते ८ टक्के लोक दरवर्षी जातात. एकट्या चिपळूण तालुक्यात ३० वस्त्यांमध्ये अशी ९०० कुटुंब असून, २५०० लोकसंख्येत १ हजार ८०० कष्टकरी आहेत. त्यांच्या आयुष्याचे प्रश्न गेल्या पिढ्यानपिढ्या तशाच आहेत. (वार्ताहर)निरक्षरतेचाही शाप...--स्थलांतरित आदीम जमातीच्या मजुरांच्या हक्काचे संरक्षण करण्यात कामगार विभाग अपयशी ठरला आहे. यामुळे रोजंदारीसाठी हंगामी स्थलांतर करणाऱ्या शेकडो कुटुंबियांपैकी ज्यांची मुले सांभाळण्यास व्यवस्था नाही, अशी मुले शाळेपासून दूर होत आहेत.