शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संस्थांच्या निवडणुका लढविणार

By admin | Updated: November 21, 2014 00:38 IST

नितीन बानुगडे-पाटील : नुसत्या बोर्डावरच्या शाखा नकोत

सांगली : आजवर शिवसेना लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहे. यापुढे संघर्षाबरोबरच लोकांचे प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने सहकारी संस्था ताब्यात घेण्याचाही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आगामी काळात ग्रामीण भागातील छोट्या संस्थांपासून जिल्हास्तरावरील स्थानिक स्वराज संस्था, बॅँका अशा प्रत्येक संस्थेच्या निवडणुका शिवसेना लढविणार आहे, अशी माहिती सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, सहकारी संस्थांचा ताबा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहे. अशा सर्व संस्थांचा ताबा लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका लढवून आम्ही घेऊ. त्याची तयारी आम्ही केलेली आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अशा संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व असणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत शिवसेना लोकहितासाठी आंदोलन करणारी संघटना म्हणून परिचित होती. यापुढे लोकांचे प्रश्न सोडविणारी संघटना म्हणून नवीन ओळख आम्ही करून देऊ. लोकहिताच्या प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरू राहील. भाजपने शब्द मोडला तरी, शिवसेना कोणताही शब्द मोडणार नाही. शिवसेना राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. स्थानिक पातळीवरही ही भूमिका आम्ही चोखपणे बजावू. गाव तिथे शाखा निर्माण केल्या जातील. केवळ बोर्डावरचे अस्तित्व दाखविणाऱ्या शाखा अपेक्षित नाहीत. दोन जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. संघटन अधिक मजबूत आणि व्यापक बनविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. ऊसदर, दुष्काळाचे प्रश्न, अवकाळी पावसाने झालेले नुकसान अशा सर्व गोष्टींवर आम्ही परखडपणे भूमिका मांडून हे प्रश्न तडीस नेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पृथ्वीराज पवार, गौतम पवार, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, विकास सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)