शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका सांगा कुणाचे?

By admin | Updated: September 15, 2014 00:03 IST

भूमिकेबाबत तर्कवितर्क : महायुतीत अस्वस्थता कायम

अविनाश बाड - आटपाडी -‘पप्पा सांगा कुणाचे?’ या धर्तीवर आता येत्या विधानसभा निवडणुकीत खानापूर-आटपाडी मतदारसंघात ‘खासदार संजय पाटील नेमकी कुणाला मदत करणार?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासदार पाटील आणि आमदार सदाशिवराव पाटील यांचे संबंध गृहमंत्री आर. आर. पाटील यांना खुपत आहेत, तर रासपचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांना मदत करण्याची घोषणा खा. पाटील यांनीच जाहीर कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे महायुतीची उमेदवारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार अनिल बाबर यांना मिळाली, तर संजयकाकांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.धनगाव येथून कृष्णा नदीतून थेट आटपाडी तालुक्यातील ५३ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे भूमिपूजन गृहमंत्री पाटील यांच्याहस्ते आटपाडीत करण्यात आले. या कार्यक्रमात गृहमंत्री पाटील यांनी, आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना मदत केल्याचा आरोप केला. वास्तविक आमदार पाटील हे कॉँग्रेसचे. त्यांना गत निवडणुकीत विसापूर मंडलमधून संजयकाकांनी मदत केली होती. सध्या संजयकाका आणि आमदार पाटील अनेक कार्यक्रमात एकत्रित दिसत आहेत. याचा अर्थ येत्या विधानसभा निवडणुकीतही संजयकाकांची मदत आमदार पाटील यांनाच मिळणार, असा काढला जात आहे.लोकसभेवेळी संजयकाकांचे ‘स्टार प्रचारक’ असलेले गोपीचंद पडळकर यांना महायुतीचे तिकीट मिळो अथवा न मिळो, पण त्यांची उमेदवारी नक्की असल्याचे संजयकाकांनी जाहीर कार्यक्रमातून सांगितले आहे. सध्या ते गावा-गावात सभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत आटपाडीतील प्रचारसभेत पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने सभेत उठून संजयकाकांना, ‘विधानसभा निवडणुकीत तुम्ही विसापूरचे तेवढे बघा,’ असे सांगितले होते. त्यावर संजकाकांनी, ‘बघा, कशी बिनटाक्याची शस्त्रक्रिया करतो ते!’ असे सांगून मदत करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संजयकाकांची मदत पडळकरांनाच मिळणार, असा दावा कार्यकर्ते आता करीत आहेत.माजी आमदार अनिल बाबर यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश महायुतीच्या तिकिटासाठीच असल्याचा मानला जात आहे. त्यामुळे महायुतीचे तिकीट मिळाले तर त्यांच्या धनुष्य-बाणाला महायुतीचा धर्म म्हणून संजयकाकांच्या कमळाच्या सुगंधाची साथ मिळणार का, याबाबत चर्चा होत आहे. बाबर यांनी गेल्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. तेव्हा आटपाडीच्या देशमुख गटासह सगळी राष्ट्रवादी त्यांच्यामागे होती. अपवाद फक्त त्यांच्यावर बंधुतुल्य प्रेम असणाऱ्या गृहमंत्री पाटील यांच्या विसापूर मंडलचा ठरला. तेथून कॉँग्रेसच्या सदाशिवराव पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. अर्थात त्यामागे संजयकाका गटाची रसद आणि सदाशिवराव पाटील यांनी फोडलेली राष्ट्रवादीची मंडळी होती. आता महायुतीचे सगळे नेते बाबर यांच्या पाठीशी राहणार असतील तर त्याला संजयकाकांचा अपवाद असेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीतून तिकीट मिळो अथवा न मिळो, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी गृहमंत्री पाटील यांच्या साक्षीने उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्हीही मंत्र्यांनी देशमुख यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि खा. संजय पाटील यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे जयंतरावांनी आग्रह केला तर देशमुखांना संजयकाकांची छुपी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच संजयकाकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संजयकाकांपुढे धर्मसंकट?खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलचा समावेश आहे. या मंडलमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खा. संजय पाटील असे दोनच गट प्रभावी आहेत. खानापूर आणि आटपाडीतील मतांची विभागणी नेत्यांनी आपले गट निर्माण करून केली आहे. परिणामी विसापूर मंडलमधील मते निर्णायक ठरत आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांचा विसापुरातील गट कोणाचे काम करणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आता सर्वच उमेदवारांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संबंध लागल्याने त्यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहणार आहे.थेट मैदानातून