शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ठरल्या पांढरा हत्ती!

By admin | Updated: November 19, 2014 23:19 IST

मुदत संपली : खर्चातही वाढ, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष

अमित काळे -तासगाव --गावस्तरावर लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशातून तयार करण्यात आलेल्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत. वीज बिले भरता येत नाहीत, ही मुख्य अडचण असली, तरी योजनांची मुदत संपल्याने त्यांची दुरूस्तीही वाढली आहे. त्यामुळे ‘पाणी’ या मूलभूत समस्येकडे लोकप्रतिनिधींनाही गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. ‘चालतंय तोपर्यंत चालवायचं’ या मानसिकतेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, विसापूर, कवठेमहांकाळ तालुक्यासाठी कवठेमहांकाळ अशा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या. येळावी योजना या तीनही योजनांपेक्षा सर्वात जुनी योजना आहे. कित्येक वर्षे याच्या माध्यमातून गावांना पाणीपुरवठा झालेला आहे. मणेराजुरी, कवठेमहांकाळ व विसापूर यामध्ये ३७, तर येळावी योजनेत ९ गावांचा समावेश आहे.मणेराजुरी, कवठेमहांकाळ व विसापूर या प्रादेशिक योजनांचा आराखडा १९९१ मध्ये करण्यात आला. १९९५ पर्यंत योजनेचे काम सुरू होते, तर ९६ मध्ये प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यावेळी २००६ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून आराखडा तयार करण्यात आला होता. मुदतही २००६ पर्यंतच होती. मात्र सध्या ही योजना सुरूच आहे. योजनेतून पाणीपुरवठाही होत आहे. अधिकृतपणे योजना कालबाह्य झाली असली तरी, ती सुरू ठेवायला अडचण नाही, हेच प्रशासनाच्या कृतीवरून स्पष्ट होते. अर्थात पाण्याची मागणी लोकांचीही आहे. येळावी योजना तर १९७६ ची आहे.येळावी वगळता तीन योजना मिळून सुमारे १ लाख ३० हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती. ती २००६ पर्यंतची होती. सध्या २०१४ मध्ये सुरू असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चितच वाढ झाली आहे. तरीही या माध्यमातून पाणी पुरवठा सुरूच आहे. सध्या जलशुध्दीकरणासाठी आवश्यक असणारी टीसीएल पावडर, तुरटी, देखभाल दुरूस्ती, देयके या बाबी कशाबशा पाणीपट्टी वसुलीतून भागतात, पण वीज बिलाचे काय, हा प्रश्न आहे. सगळी वसुली झाली तरी हे बिल भरता येत नाही, हे वास्तव असतानाही यावर शासन ठोस भूमिका घेत नाही, हे विशेष!कृष्णा नदी (भिलवडी) येथून पाणी उचलायचे. पाचवा मैल येथे त्याचे शुध्दीकरण करायचे व नंतर पुरवठा, या दोन टप्प्यात योजना चालवली जात आहे. वीज वितरणकडून सध्या बिलाची आकारणी प्रति युनिट साधारण ६ रुपये दराने होत आहे. ही आकारणी अन्य योजनांप्रमाणे (सहकारी, एकत्र येऊन केलेल्या) करण्यात यावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दर कमी झाला तरच योजना समर्थपणे चालू शकतील, अन्यथा योजनांचे भविष्य अंधारातच आहे. गावपातळीपासूनच लोक प्रतिनिधींनी पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. योजना तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्या म्हणून लोकांना पाणी नाही. पर्यायी व्यवस्थेतून त्यांना पाणी घ्यावे लागते. खर्चाचा व उत्पन्नाचा मेळ लागत नाही. याचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनांबाबत ठोस भूमिका घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. प्रतियुनिट सहा रुपये दराने आकारणीमणेराजुरी, कवठेमहांकाळ व विसापूर यामध्ये ३७, तर येळावी योजनेत ९ गावांचा समावेश आहे. जलशुध्दीकरणासाठीची टीसीएल पावडर, तुरटी, देखभाल दुरूस्ती, देयके या बाबी कशाबशा पाणीपट्टी वसुलीतून भागतात. पण पाणीपट्टीची सगळी वसुली झाली तरीही वीज बिल भरता येत नाही.महावितरणकडून सध्या बिलाची आकारणी प्रति युनिट साधारण ६ रुपये दराने होत आहे. महावितरणने प्रति युनिट दरामध्ये कपात करावी, अशी मागणी होत आहे.