शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची शुद्धता वाऱ्यावरच

By admin | Updated: July 26, 2014 00:31 IST

गढूळ, मातीमिश्रित पाणीपुरवठा : आवश्यक तपासणी नाही

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहरातील पाच लाख लोकसंख्येला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता कोणत्याही कसोटीवर खरी उतरण्याची शक्यता नाही. महापालिकेकडून दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत जातात. काही मोजक्याच चाचण्या करून अहवाल दिला जाते, पण या चाचणीत पाणी दूषित निघतच नाही. उलट नागरिकांना मात्र कधी मातीमिश्रित, तर कधी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेविषयी नागरिकही साशंक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. नळाला लालभडक पाणी आल्याने महापालिकेच्या शुद्धीकरण यंत्रणेचे पितळ उघडे पडले. त्यात नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तीनपैकी दोन बेड बंद होते. एका बेडवरून पाणी शुद्ध करून पुरवठा होत होता. हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरू आहे. माळबंगला येथील शुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक क्लॅरिफायर व एक फिल्टर बेड बंद आहे. त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. वास्तविक दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. म्हणजेच काम सुरू झाल्यापासून सांगलीकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला, असेच म्हणावे लागेल. तरीही पाण्याचे नमुने कधीच दूषित आढळले नाहीत. जून महिन्यात केलेल्या चाचणीत एकदाही दूषित पाणी आढळले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मातीमिश्रित गढूळ पाणी नागरिकांच्या गळी उतरवूनही, प्रशासन मात्र हे पाणी पिण्यालायक असल्याचे सांगत आहे. वास्तविक महापालिकेकडून दररोज वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सांगलीत १० ते ११ जागी, तर मिरजेत पाच ठिकाणचे नमुने घेतले जातात. पंधरा ते सोळा नमुन्यांपैकी सात ते आठ नमुनेच प्रयोगशाळेकडे जातात. महिन्याची सरासरी पाहिल्यास, दरमहा पाण्याचे २५० नमुने प्रयोगशाळेकडे जात आहेत. महापालिकेकडे पाणी तपासणीची कसलीही यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी होते. प्रयोगशाळेत शुद्ध पाण्यासाठी प्रमाणकानुसार ६५ तपासण्या करण्याची गरज आहे. वस्तुत: केवळ वीसच तपासण्या केल्या जातात. त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्ध होतो का, असा प्रश्न समोर उभा आहे. (प्रतिनिधी)