शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

देववाडीच्या ग्रामस्थांचा शिराळ्यात माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील धनाजी खोत याने अतिप्रसंग करून महिलेचा निघृण खून केला. नराधम धनाजी ...

शिराळा

: देववाडी (ता. शिराळा) येथील धनाजी खोत याने अतिप्रसंग करून महिलेचा निघृण खून केला. नराधम धनाजी खाेत याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अतिजलद न्यायालयात हा खटला चालवा, यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, अशा मागण्या करीत देववाडी व परिसरातील गावांमधील हजारो ग्रामस्थांनी साेमवारी शिराळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी महिला, विद्यार्थ्यांनी, नागरिक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी प्रभारी सहाय्यक जिल्हाधिकारी आरोशी सिंग, तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

गुरुवार दि. २१ रोजी पीडित महिला शेती कामासाठी स्वतःच्या शेतामध्ये गेली असताना, निर्मनुष्य वस्तीचा गैरफायदा घेउन संशयीत धनाजी खोत याने अतिप्रसंग करून त्या महिलेची निघृण हत्या केली. या घटनेचे परिसरात संतप्त पडसाद उमटले. साेमवारी शिराळा येथील नाथमंदिर फाट्यावरून देववाडी येथील अबाल वृद्ध, महिला हजारोंच्या संख्येने तहसीलदार कार्यालयावर आले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सुखदेव पाटील, सरपंच संजना वरेकर, दिव्या खोत, रेखा खोत, डॉ. उषाताई दसवंत यांनी ही घटना काळिमा फासणारी असल्याचे सांगत आराेपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले हाेते.

यावेळी मृत महिलेच्या मुलांसह सरपंच संजना वरेकर यांनी तहसीलदार शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की. पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी किंवा त्यांच्या उपजीविकेची साधन व्यवस्था व्हावी, पीडित कुटुंबातील मुलांना शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळावी, खटला न्यायालयात सादर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पुरावे, साक्षीदार हे भक्कम असणे गरजेचे आहे. यामुळे संबंधितांना सखोल चौकशीचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिंदे म्हणाले. यांनी पीडित महिलेच्या कुटुंबास न्याय मिळण्यासाठी प्रशासनाकडून सर्व ती मदत करू.

यावेळी विराज नाईक, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक, सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, महादेव कदम, रवी पाटील, नगरसेवक केदार नलवडे, संगीता साळुंखे, शिवाजीराव नांगरे, सचिन नांगरे, अमर खोत, अविनाश खोत, अमृता खोत, योगिता खोत, मीना बेंद्रे, राजेंद्र साळुंखे, राम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फाेटाे : २५ शिराळा ७