शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

भगवान पाटील यांच्या निवडीमागे विजयभाऊंची राजकीय खेळी

By admin | Updated: June 1, 2015 00:19 IST

इस्लामपुरातील राजकारण : एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा

अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर शहरातील एखाद्या कोपऱ्यात टाचणी पडून आवाज झाला तरी, त्याचे खापर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्यावरच फोडले जाते. राजारामबापू सह. साखर कारखान्याच्या संचालक पदावर माजी नगराध्यक्ष, मुलूखमैदानी तोफ भगवान पाटील यांच्या निवडीमागे विजयभाऊ पाटील यांचाच हात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या निवडीने त्यांनी एका दगडात दोन-चार पक्षी मारल्याची चर्चा आहे. त्यामुळे कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटतील, असे संकेत मिळत आहेत.राजारामबापू कारखान्याच्या संचालक पदासाठी इस्लामपूर शहरातून माजी संचालक पोलीसपाटील बाळासाहेब पाटील, शंकर निवृत्ती पाटील, त्यांच्या पत्नी सौ. पद्मावती पाटील आणि भगवान पाटील यांच्यासह विजयभाऊ पाटील यांच्या घरातील शहाजी पाटील यांच्या नावाची चर्चा होती. यापैकी शहाजी पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली. गत निवडणुकीत पोलीसपाटील यांच्या भावकीतून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या निवडीसाठी विजयभाऊ यांनीही हिरवा कंदील दाखवला होता, तर त्यांचे अंतर्गत विरोधक असलेले शंकर पाटील यांच्या पत्नी सौ. पद्मावती पाटील यांना संधी देण्यात आली होती.नगरपालिका निवडणुकीत विजयभाऊ यांच्याविरोधात आर. डी. पाटील यांना उभे करण्यात अ‍ॅड. सुधीर पिसे, शंकर पाटील, एस. पी. पाटील यांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळेच भगवान पाटील यांना समर्थन देऊन विजय पाटील यांच्यामागे लागलेला शनि दूर केल्याची चर्चा आहे. तसेच शहर अध्यक्षपदी शहाजी पाटील यांची निवड करताना भगवान पाटील यांच्यावर झालेला अन्यायही आता पाटील यांच्या निवडीने दूर झाला आहे.भगवान पाटील हे आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेतच, पण ते ‘कृष्णा’च्या राजकारणात डॉ. सुरेश भोसले यांच्या पाठीशी आहेत. तसेच विजयभाऊ यांच्या घरातील शहाजी पाटील गत निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासोबत होते. परंतु यावेळी शहाजी पाटील यांचे बंधू संजय पाटील यांनी भोसले गटातून उमेदवारी दाखल केली आहे. संजय पाटील यांना विजय पाटील यांचेच पाठबळ असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे विजयभाऊ पाटील यांच्यासह त्यांच्याच घरातील राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, शहाजी पाटील यांच्यावर निष्ठा असलेले युवराज पाटील यांनी विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच डॉ. इंद्रजित मोहिते गटातून आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. मलगुंडे विरोधी गटात असताना त्यांना नगराध्यक्ष करण्यात विजयभाऊ यांचेच योगदान असल्याची चर्चा होती. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांचे रस्ते विजयभाऊ यांच्या घराकडे येऊन थांबतात. एकूणच विजयभाऊंनी आपल्या रस्त्यातील काटे दूर करण्याचा डाव आखल्याची चर्चा आहे. इस्लामपूरच्या राजकारणात ज्यांना ज्यांना मी ताकद दिली, त्यातील बरेच माझ्याविरोधात बोलतात. ताकद दिली नाही तरीही ओरडतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अ‍ॅड. चिमण डांगे यांच्या निवडीविषयी प्रयत्न केला होता. त्यात आपणास यश आले नाही. ‘राजारामबापू’ आणि कृष्णा कारखाना निवडणुकीत आपण कोणतेही राजकीय डाव केलेले नाहीत.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपालिका