मांगलेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:28+5:302021-09-25T04:28:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : मांगले ते वारणानगर मार्गावर पाऊतका मंदिरानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत मांगले (ता. शिराळा) येथील शिवाजी ...

Two-wheeler killed in collision with unknown vehicle in Mangle | मांगलेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मांगलेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

मांगले : मांगले ते वारणानगर मार्गावर पाऊतका मंदिरानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत मांगले (ता. शिराळा) येथील शिवाजी बबन सावंत (वय ५०) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मांगले येथील नीळकंठ वसाहतीत राहणारे शिवाजी सावंत दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीव्ही २८६८) देववाडीला निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. तोंडाला व पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद त्यांचा भाऊ संताजी बबन सावंत यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार आनंदा मठकरी करत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in collision with unknown vehicle in Mangle