शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मांस खाण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळीने केली मोरांची शिकार, ग्रामस्थांनी पकडले; सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:47 IST

ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वीच आला होता

हातनूर : हातनूर (ता. तासगाव) येथे शनिवारी रात्री ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या टोळीने मांस खाण्यासाठी दोन मोरांची शिकार केल्याचा प्रकार घडला. ग्रामस्थांनी त्यांना घेरून ताब्यात घेत वनविभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले.वामन लक्ष्मण जाधव (वय ३६, रा. कुंभार्डा, ता. महाड), रत्नाकर अर्जुन पवार (वय ३९, रा. अंबवली), किशोर काशिराम पवार (वय २२, रा. सापेगाव), सचिन बाळकृष्ण वाघमारे (वय २३), सत्यवान बाळकृष्ण वाघमारे (वय २१), नितीन बाळकृष्ण वाघमारे (वय २०, तिघे रा. चोचिंदे, ता. महाड) या रायगड जिल्ह्यातील सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.हातनूर परिसरात ऊसतोड करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झाली आहे. ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वीच आला होता. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. शनिवार रात्री अजित सोनटक्के यांच्या शेतात झाडावर बॅटरीचा उजेड दिसला. तेव्हा रात्री दहा वाजता सचिन पाटील, उत्तम पाटील, शिवम पाटील, अजित सोनटक्के, बाळासाहेब पाटील यांच्यासह २५ हून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी टोळीला घेरून ताब्यात घेतले. टोळीने दोन मोरांची शिकार केल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी तासगाव पोलिस आणि वन विभागाशी संपर्क साधून मध्यरात्री १२ वाजता त्यांना बोलावून घेतले.वनविभागाच्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले. रविवारी दुपारी सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल कल्पना पाटील, सागर पताडे, ओंकार शेळके, दीपाली सागावकर, सुनील पवार आदींचे पथक पंचनाम्यासाठी हातनूर येथे संशयितांना घेऊन आले होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या ठिकाणी त्यांना मोराची पिसे, लगोर, बॅटरी आदी शिकारीसाठीचे साहित्य जप्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Six Arrested for Peacock Poaching in Hatnur Village

Web Summary : Six migrant workers from Raigad district were arrested in Hatnur, Sangli for poaching two peacocks. Villagers caught them red-handed and handed them over to police and forest officials. Authorities seized feathers and hunting equipment.