शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अग्निशमन अधिकाऱ्यावरील खुनी हल्लाप्रकरणी दोघांना अटक, दोघे पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:46 IST

सुपारी देऊन हल्ला केल्याची शक्यता?, प्रथमेश पाटोळे रेकॉर्डवरील गुन्हेगार

सांगली : महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर झालेल्या खुनी हल्लाप्रकरणी संशयित प्रथमेश सुरेश पाटोळे (वय २३, रा. दत्तनगर, बामणोली) व तोहीद ऊर्फ हुसेन फारूख सुतार (१९, रा. हांडे गल्ली, दत्तनगर, बामणोली) या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली.

आणखी दोघे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुपारी देऊन हा खुनी हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतू नेमक्या कोणत्या कारणातून सुपारी दिली असावी याचा शोध सुरू आहे.

महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले माळी मंगळवारी सायंकाळी मित्र शंकर बाजीराव जगदाळे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. कलानगर येथील घराजवळ आल्यानंतर माळी दुचाकीवरून खाली उतरताच हल्लेखोरांनी माळी यांना ‘आता तुला सोडत नाही’ असे म्हणून चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पलायन केले. माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शंकर जगदाळे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित प्रथमेश पाटोळे व तोहीद सुतार या दोघांना ताब्यात घेत बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. आणखी दोघे संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात सुपारी देऊन हा हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतू नेमके कारण काय? हे अद्याप तपासात स्पष्ट झाले नाही.

प्रथमेश पाटोळे रेकॉर्डवरील गुन्हेगार

शहर पोलिसांनी कलानगर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून प्रथमेश व तोहीद या दोघांना अटक केली आहे. प्रथमेश पाटोळे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांना कोणीतरी सुपारी दिल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Two arrested in attack on fire officer, two absconding.

Web Summary : Two arrested in Sangli for attack on fire officer Sunil Mali. Police suspect a contract killing; investigation ongoing to determine the motive. Two more suspects are at large. The arrested have been remanded to police custody.