शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या विकास आराखड्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 18, 2014 23:25 IST

विलासराव जगताप : निवडणुकीतील विजयाबद्दल ग्रामस्थांतर्फे सत्कार

जत : जत शहर आणि तालुक्याचा विकास आराखडा तयार करुन त्याला मूर्तस्वरुप देण्यासाठी मंत्रालय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. परंतु त्यासाठी तालुक्यातील जनतेचे मला पाठबळ आवश्यक आहे, असे मत आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले.जत शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्यावतीने गांधी चौक जत येथे आमदार विलासराव जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मी तालुक्यातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून यापुढील पाच वर्षे काम करणार आहे. पक्ष, गट, तट यामध्ये याला स्थान असणार नाही. मी जरी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो असलो तरी मंत्री अथवा इतर कोणीही असो त्यांच्या दबावाखाली काम करणार नाही, असा इशारा देऊन आमदार विलासराव जगताप पुढे म्हणाले की, तालुक्यात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आणणे, जत तालुक्याचे विभाजन करणे, खराब रस्ते दुरुस्त करणे, कृषी महाविद्यालयात मंजूर करून आणणे या कामांची पूर्तता करण्याचा माझा सतत प्रयत्न राहणार असून, मंत्री पदापेक्षाही हे काम मोठे आहे. येथील प्रस्थापितांच्या विरोधात मी राजकारणात आलो होतो. तीस वर्षानंतर मला त्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचे आणि कायम स्मरणात राहणारे काम मी करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.यावेळी बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड, नगरसेवक उमेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, प्रमोद सावंत, बाजी केंगार, रमेश बिराजदार, इकबाल गवंडी, महादेव कोळी, नगराध्यक्ष रवींद्र साळे, माया साळे, नंदा कांबळे, संगीता माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)