शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

झोळेवाडी येथे जखमी घुबडावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

शिराळा : शिराळा तालुक्यातील झोळेवाडी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या गवानी जातीच्या घुबडाचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

शिराळा

: शिराळा तालुक्यातील झोळेवाडी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या गवानी जातीच्या घुबडाचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रहार संघटनेचे बंटी नांगरे-पाटील यांनी या जखमी घुबडास कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.

वाकुर्डेजवळ असणाऱ्या झोळेवाडी येथील सूरज तालगावकर यांना सकाळी सहाच्या दरम्यान झुडपामध्ये मांजरे एका पक्ष्यावर हल्ला करत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता जखमी अवस्थेत घुबड झाडामध्ये पडले होते. यावेळी त्यांनी त्वरित शिराळा येथील प्रहार संघटनेचे बंटी-नांगरे यांना कळवले. बंटी नांगरे व प्रशांत शिंदे हे आठच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत सूरज तालगावकर हे त्याठिकाणी थांबून मांजरांच्या हल्ल्यापासून रोखत होते.

घुबडाला जखमी अवस्थेत शिराळा वनविभाग येथे दाखल केले. मात्र वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी घुबडाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले.

कोल्हापूर येथील डॉ. संतोष वाळवेकर यांनी या घुबडावर प्राथमिक उपचार करून तपासणी केली असता उजव्या पंखाचे हाड मोडले असून त्याठिकाणी सेप्टिक झाले असलेचे आढळून आले. या गंभीर दुखापतीमुळे सध्या शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार करून त्याचे शरीर शस्त्रक्रिया करण्यायोग्य करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उपचार सुरू करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

फोटो-२७ शिराळा२