शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दोघे ठार

By admin | Updated: May 17, 2015 01:21 IST

दोघे बचावले : चाबूकस्वारवाडीतील घटना

कवठेमहांकाळ : सलगरे (ता. मिरज) येथून खत घेऊन चाबूकस्वारवाडीकडे निघालेला ट्रॅक्टर शनिवारी विहिरीत कोसळून पाण्यात गुदमरून दोघे ठार झाले. तानाजी महादेव आकळे (वय ४७) व विनायक ऊर्फ पप्पू कल्लाप्पा गुंडेवाडी (१८, दोघे रा. चाबूकस्वारवाडी, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. अन्य दोघांनी प्रसंगावधान राखून विहिरीत ट्रॅक्टर उलटत असतानाच उडी मारली. त्यामुळे त्यांचे जीव वाचले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. शनिवारी सकाळी चाबूकस्वारवाडी येथील नितीन होनराव यांचा ट्रॅक्टर व छोटी ट्रॉली घेऊन चालक शशिकांत गुंडेवाडी व अन्य तिघे शेतमजूर कोंबडी खत भरण्यासाठी सलगरेस गेले होते. खत भरून ट्रॅक्टर चाबूकस्वारवाडीकडे परतत असताना सलगरेच्या पूर्वेस दीड किलोमीटरवर रस्त्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या अण्णासाहेब उतरे यांच्या विहिरीत तो अचानक उलटला. सोबत खताची छोटी ट्रॉलीही कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ट्रॅक्टर विहिरीत उलटत असल्याचे जाणवल्याने चालक शशिकांत गुंडेवाडी व सोबत बसलेले विलास खोत यांनी उडी मारून स्वत:चा जीव वाचविला; परंतु बेसावध असणाऱ्या तानाजी आकळे व विनायक गुंडेवाडी यांना जीव गमवावा लागला. ट्रॅक्टरसह ट्रॉली दोघांच्या अंगावर उलटल्याने पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने उतरे वस्तीजवळील लोकांनी लगेचच विहिरीकडे धाव घेतली; परंतु पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाल्याने तातडीने काहीच करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा मोटारीने पाणीउपसा सुरू केला; पण विहीर चाळीस फुटांपर्यंत पाण्याने भरलेली असल्याने या प्रयत्नाला यश आले नाही. दोरखंडाच्या सहायाने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर माधवनगर येथील खासगी क्रेन मागवून सायंकाळी ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यात आली. मृत तानाजी आकळे शेतमजूर असून, त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. तर विनायक गुंडेवाडी हा अठरा वर्षांचा युवक शेतमजुरी करीत होता. मृतदेह, ट्रॅक्टर काढताना दमछाक अपघाताचे वृत्त समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठ्या दोरखंडाचा वापर करण्यात आला. यावेळी मनुष्यबळ असूनही लोकांची दमछाक झाली. काहीजण पाण्यात उतरले. दोरखंडाचा वापर करून मृतदेह बाहेर काढण्यात सायंकाळी साडेचारला यश आले. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली.(प्रतिनिधी)