शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विजयनगरला तीन लाखाचे पीक संजीवक सील

By admin | Updated: August 26, 2015 23:04 IST

कंपनीवर छापा : कृषी विभागाची कारवाई

सांगली : विजयनगर-म्हैसाळ (ता. मिरज) येथे विनापरवाना पीक संजीवक तयार करणाऱ्या ‘ब्लॅकवॉर्मस’ कंपनीवर बुधवारी छापा टाकून तेथील २ लाख ८९ हजार १०० रुपयांचा पीक संजीवकाचा साठा सील करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ही कारवाई केली. नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई होणार आहे. अधिकाऱ्यांनी सकाळी छापा टाकल्यानंतर औषध दुकानांच्या तपासणीकडे दुर्लक्ष केले. या कारवाईबाबत साशंकता आहे.म्हैसाळजवळील विजयनगर येथे विनापरवाना शेतीची औषधे तयार केली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे आली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मिरज पंचायत समितीचे कृषी अधिकारी अण्णासाहेब बारवकर यांनी विजयनगर येथील बाळासाहेब शिंदे, श्रीधर शिंदे यांच्या ‘ब्लॅकवॉर्मस’ कंपनीवर छापा टाकला. या कंपनीच्या २ लाख ८९ हजार १०० रुपये किमतीच्या उत्पादनास विक्री बंदचे आदेश दिले. शिंदे यांनी पीक संजीवक उत्पादनासाठी शासनाकडून परवाना घेतलेला नाही. याशिवाय, कंपनीमध्ये साठा रजिस्टर नोंदवही सापडली नाही. यामुळे कंपनीमधून किती औषधांचा बाहेर पुरवठा झाला, हे कळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादकाने जेवढे उत्पादन केले, ते सर्व बाजारपेठेत पाठविल्याचे त्यांनी सांगितले. तेथे उपलब्ध पीक संजीवकाचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. अहवालामध्ये पीक संजीवकाशिवाय अन्य घटक आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पॅकिंगवर दोन पत्तेयेथील ‘ब्लॅकवॉर्मस’ या पीक संजीवकाच्या एक लिटरच्या बाटलीवर विजयनगर येथे उत्पादन घेतले जात असल्याचे लेबल आहे, तर दुसऱ्या बाटलीवर हे उत्पादन नाशिक येथे घेतले जात असल्याचा पत्ता आहे. या दोन पत्त्यांबाबत तपास करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.