शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी आघाडी काँग्रेसबरोबर जाण्याचे संकेत

By admin | Updated: July 16, 2015 23:19 IST

सांगली बाजार समिती : शनिवारी पॅनेल होणार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : सांगली बाजार समिती निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या असतानाच, राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी काँग्रेसबरोबर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व जनता दलाचे नेते एकमेकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता बळावली आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील यांचा गट एकत्र आला आहे. त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखती शनिवारपासून सुरू होत आहेत. काँग्रेसने यापूर्वीच जनसुराज्य पक्षाशी युती जाहीर केली आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीनुसार तिसरी आघाडीही ही निवडणूक लढविणार आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत. शनिवारी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर पॅनेल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी तिसऱ्या आघाडीने काँग्रेससोबत यावे, असे आवाहन केल्याने, तिसऱ्या आघाडीने यासंदर्भात विचार सुरु केला आहे. याबाबत तिसऱ्या आघाडीने चर्चा सुरु केली आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी युतीकाँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती शनिवारपासून सुरु होत आहेत. तिसरी आघाडी शनिवारी पॅनेल जाहीर करणार आहे. या दोन्ही पक्षात युती होणार असल्यामुळे तिसऱ्या आघाडीचे पॅनेल आता २० जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. राष्ट्रवादीने बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. यापुढे राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखणे याला आमचा प्राधान्यक्रम असणार आहे. काँग्रेसने युतीचा प्रस्ताव दिल्यास आम्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. आमचे पॅनेल येत्या शनिवार ंिकंवा रविवारी जाहीर करु. खा. राजू शेट्टी, माजी आ. शरद पाटील, माजी आमदार संभाजी पवार यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.- पृथ्वीराज पवार, शिवसेना नेते.