शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

चोर समजून दोघांना बेदम चोपले

By admin | Updated: July 19, 2015 00:41 IST

कामेरीजवळील घटना : जखमी एकजण गुन्हेगारी प्रवृत्तीचा

इस्लामपूर : कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील दुधारी (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर १५०० रुपयांचे डिझेल भरून त्याने पैसे न देताच पलायन करणाऱ्या टेम्पोचालकासह अन्य एकास कामेरी येथे रात्रगस्त घालणाऱ्या जमावाने रात्री साडेआठच्या सुमारास बेदम मारहाण केली. दुधारीपासून पाठलाग करणाऱ्या दोघांनी चोर-चोर असे म्हटल्याने हा पैसे बुडवून पळणारा टेम्पोचालक रात्रगस्तीच्या जमावाच्या तावडीत सापडला. दीपक सोपान कुंभार (वय ३१, रा. रेठरेहरणाक्ष) आणि हणमंत पाटील (वय ६२, रा. बोरगाव) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोघांना मारहाण करणाऱ्या चौघा अज्ञातांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अप्पर पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी या घटनेची वस्तुस्थिती पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले, दीपक कुंभार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध मारहाण, महिलेचा छळ, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. शुक्रवारी सायंकाळी तो आपला टेम्पो (क्र. एमएच १०, एक्यू ९४९३) घेऊन इस्लामपूरहून बोरगावकडे गेला. बोरगाव येथे मित्र हणमंत पाटील यांना डिझेल टाकायचे आहे म्हणून सोबत घेतले. दुधारीजवळील पंपावर १५०० रुपयांचे डिझेल भरले आणि तेथून पैसे न देताच वाहन घेऊन त्याने पलायन केले. या घटनेनंतर पंपावरील दोघा कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवरून दीपक कुंभार याचा पाठलाग केला. मात्र त्याने दाद दिली नाही. इस्लामपूर शहरातून त्याने मधल्या मार्गाने कामेरीचा रस्ता पकडला. दरम्यान, कामेरी गावाजवळील दत्तनगर परिसरात रात्रगस्त घालणारे युवक दिसल्यावर पाठीमागून टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘चोर-चोर’ अशी आरोळी ठोकली. त्यावरून रात्रगस्त घालणाऱ्या युवकांनी दीपक कुंभार याला पाठलाग अडवून मारहाण केली. मात्र हणमंत पाटील यांच्याकडे चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)