शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दादा घराण्यात कोणतेही वाद नाहीत

By admin | Updated: September 17, 2014 23:05 IST

विशाल पाटील : सांगलीतील समर्थकांच्या बैठकीत स्पष्टोक्ती

सांगली : वसंतदादा घराण्यात कोणतेही वाद नाहीत, आम्ही एकत्रित काम करीत आहोत, विधानसभा निवडणुकीतही एकसंधपणेच लढू, अशी स्पष्टोक्ती विशाल पाटील यांनी बुधवारी मदन पाटील समर्थकांच्या बैठकीत केली. बैठकीतील त्यांच्या उपस्थितीने दादा घराण्यातील तथाकथित वादाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सांगलीच्या विष्णुअण्णा भवनात मदन पाटील समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत समर्थकांनी पक्षांतर्गत विरोधकांवर तसेच राष्ट्रवादी व भाजप नेत्यांवर टीका केली. तीन तास ही बैठक चालू होती. काही समर्थकांनी कार्यकर्त्यांना उपदेश व सल्ले दिले. मदन पाटील यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. मात्र मदन पाटील यांनी केवळ कार्यकर्ते व समर्थकांची मते जाणून घेतली. त्यांनी भाषण केले नाही. शहरातील व्यापारी, उद्योजक, नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. यावेळी माजी जि. प. सदस्य पी. एल. रजपूत म्हणाले की, वसंतदादा घराण्यातील वादाचा मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. वास्तविक असे कोणतेही चित्र सध्या नाही. तरीही विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी एकसंधपणे काम केले तर काँग्रेसला यश मिळू शकते. उद्योजक रंगराव इरळे यांनी एलबीटीचा मुद्दा उपस्थित केला. एलबीटीप्रश्नी महापालिकेने चांगली भूमिका घेतली आहे. यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काही अडेलतट्टू व्यापारी व उद्योजकांमुळे अन्य लोक वेठीस धरले जात आहेत. आपणच कर भरायचा नाही आणि पुन्हा शहराच्या विकासाच्या गप्पा मारायच्या, या गोष्टी चुकीच्या आहेत. नगरसेवक विवेक कांबळे, हारुण शिकलगार, अनारकली कुरणे, शैलेंद्र सॅमसन, हणमंत पवार, दत्तात्रय बन्ने, व्यंकाप्पा नायकर, महंमद भोजाणी, निसार संगतरास, शेवंता वाघमारे, विजय खोत, डी. जी. मुलाणी यांनी मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)